अभी तो सारा आसमान बाकी है...! वाचा, धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणाले बॉलिवूड सेलिब्रिटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 11:11 IST2020-08-16T11:09:47+5:302020-08-16T11:11:19+5:30

माहीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्मा, रणवीर सिंग, अनुपम खेर आदींच्या  पोस्ट

ms dhoni retires anushka sharma riteish deshmukh bollywood celebrities bid emotional goodbye to ms dhoni | अभी तो सारा आसमान बाकी है...! वाचा, धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणाले बॉलिवूड सेलिब्रिटी 

अभी तो सारा आसमान बाकी है...! वाचा, धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणाले बॉलिवूड सेलिब्रिटी 

ठळक मुद्देआमच्या मनातून तू कधीही निवृत्त होणार नाहीस, अशा शब्दांत अभिनेता रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे. मेरे प्यारे...

भारताचा माजी कर्णधार  महेंद्रसिंग धोनी याने शनिवार (१५ ऑगस्ट) रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले.   त्यामुळे सध्या सोशल मीडियावर एम.एस. धोनीच्या निवृत्तीची  चर्चा रंगली आहे. बॉलिवूडमध्येही धोनीचे अनेक चाहते आहेत. माही क्रिकेटमधून संन्यास घेणार म्हटल्यावर अनेकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘धन्यवाद एस.एस. धोनी’


अभिनेत्री आणि क्रिकेटपटू विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्माने एक पोस्ट शेअर केली आहे. धोनीचा फोटो शेअर करत तिने लिहिले, ‘कधीही विसरता न येणाºया आठवणी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद एस.एस. धोनी....’

‘लव्ह यू माही’


लव्ह यू माही भाई... आम्हाला अभिमानास्पद क्षण दिल्याबद्दल आभार, अशी पोस्ट अभिनेता रणवीर सिंगने शेअर केली आहे.

नो...

नाही... तू सर्वोत्तम म्हणून ओळखला जातो... आमचे मनोरंजन केल्याबद्दल आभार, अशी पोस्ट अभिनेता रणदीप हुड्डा याने केली आहे.

आमच्या मनातून तू कधीही निवृत्त होणार नाही...

आमच्या मनातून तू कधीही निवृत्त होणार नाहीस, अशा शब्दांत अभिनेता रितेश देशमुखने प्रतिक्रिया दिली आहे.

मेरे प्यारे...

‘एम. एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमात माहीच्या पित्याची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. मेरे प्यारे महेद्र सिंग धोनी जिंदगी की असली उडान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठी भर जमी हमने, अभी तो सारा आसमान बाकी है, असे त्यांनी लिहिले आहे.

अ चॅप्टर एन्ड्स...

अ चॅप्ट एन्ड्स इन इंडियन क्रिकेट... अशी प्रतिक्रिया अभिनेत्री तापसी पन्नूने दिली.


 

Web Title: ms dhoni retires anushka sharma riteish deshmukh bollywood celebrities bid emotional goodbye to ms dhoni