तिरुपती बालाजी अन् दगडूशेठ गणपती दर्शनानंतर मृणाल ठाकूरला आला दैवी अनुभव, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 13:23 IST2026-04-09T12:59:24+5:302026-04-09T13:23:44+5:30

मृणालनं तिरुपती बालाजी आणि पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनानंतर आलेला आध्यात्मिक अनुभव सांगितला. 

Mrunal Thakur Spiritual Experience Tirupati Balaji Dagdusheth Ganpati Temple Interview Dacoit Ek Prem Katha | तिरुपती बालाजी अन् दगडूशेठ गणपती दर्शनानंतर मृणाल ठाकूरला आला दैवी अनुभव, म्हणाली...

तिरुपती बालाजी अन् दगडूशेठ गणपती दर्शनानंतर मृणाल ठाकूरला आला दैवी अनुभव, म्हणाली...

दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या तिच्या आगामी 'डकैत: एक प्रेम कथा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने मृणाल विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. अशातच एका मुलाखतीमध्ये मृणालनं तिरुपती बालाजी आणि पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शनानंतर आलेला आध्यात्मिक अनुभव सांगितला. 

मृणाल ठाकूरने नुकतीच रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी मृणालनं तिला आलेल्या आध्यात्मिक अनुभवावर भाष्य केलं. तिरुपती बालाजीच्या दर्शनाबद्दल बोलताना मृणाल म्हणाली, "मला गेल्या १०-१२ वर्षांपासून तिरुपतीला जायचं होतं, पण योग येत नव्हता. म्हणतात ना, जेव्हा देवाचं बोलावणं येतं, तेव्हाच आपण तिथे जाऊ शकतो आणि माझ्या बाबतीत अगदी तसंच झालं. अचानक मला कॉल आला की आपण परवा दर्शनाला जाऊ शकतो आणि मी लगेच होकार दिला. जी इच्छा १० वर्षांपासून पूर्ण होत नव्हती, ती फक्त दोन दिवसांत पूर्ण झाली".

मंदिरातील त्या दैवी अनुभवाबद्दल मृणालने अत्यंत प्रांजळपणे आपले मत मांडले. ती म्हणाली, "तिरुपती मंदिरात मूर्तीसमोर उभी असताना माझ्या अंगावर शहारे आले आणि मी नकळत रडायला लागले. आयुष्यात घडलेल्या सर्व चांगल्या-वाईट गोष्टी माझ्या डोळ्यांसमोरून सरकत होत्या. अशीच अनुभूती मला काशी विश्वनाथ मंदिरातही आली होती. त्या क्षणी जी ताकद मिळते, ती शब्दांत सांगता येणार नाही".

पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाचा अनुभव सांगताना ती म्हणाली, "तिरुपती दर्शनाच्या काही दिवंसानंतर मी दगडूशेठ मंदिरात गेले. तिथे उभी राहिल्यावर मला खूप कृतज्ञता वाटली. शांतपणे बाप्पाच्या मूर्तीच्या डोळ्यांत पाहताना एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. मी आधी अशी नव्हते. पूर्वी केवळ आईसोबत जायचं म्हणून मी मंदिरात जायचे".

'डकैत' कधी प्रदर्शित होणार?
मृणाल ठाकूर सध्या तिच्या प्रोफेशनल लाइफमध्येही खूप सक्रिय आहे. 'डकैत' चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटाकडून तिला मोठ्या अपेक्षा आहेत.  या सिनेमात मृणालसोबत दाक्षिणात्य सुपरस्टार अदिवी शेष मुख्य भूमिकेत असून, ही एक अ‍ॅक्शन-पॅक्ड रिव्हेंज ड्रामा कथा असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होत आहे. या सिनेमात अनुराग कश्यपही अभिनय करताना दिसणार आहे. सर्वांना मृणालच्या या नव्या सिनेमाची उत्सुकता आहे. 'डकैत' हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत एकाच वेळी शूट करण्यात आला असून तो १० एप्रिल २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

Web Title : तिरुपति बालाजी और दगडूशेठ गणपति के दर्शन के बाद मृणाल ठाकुर को दैवीय अनुभव।

Web Summary : तिरुपति बालाजी और दगडूशेठ गणपति मंदिर के दर्शन के बाद मृणाल ठाकुर ने अपने आध्यात्मिक अनुभव साझा किए। उन्होंने कृतज्ञता और सकारात्मक ऊर्जा से अभिभूत महसूस किया, अपनी यात्राओं के दौरान एक गहरा संबंध और भावनात्मक जागृति का वर्णन किया। उनकी फिल्म 'डकैत' 2026 में रिलीज होगी।

Web Title : Mrunal Thakur experiences divine after Tirupati Balaji and Dagdusheth Ganpati visit.

Web Summary : Mrunal Thakur shared her spiritual experiences after visiting Tirupati Balaji and Dagdusheth Ganpati temples. She felt overwhelmed with gratitude and positive energy, describing a profound connection and emotional awakening during her visits. Her film 'Dakait' releases in 2026.