मृणाल ठाकूरसाठी आईनं बनवलं अस्सल खान्देशी 'वांग्याचं भरीत', पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 15:41 IST2026-02-09T15:26:47+5:302026-02-09T15:41:59+5:30
मृणाल ठाकूरची वांग्याचं भरीत खाण्याची इच्छा तिच्या आईनं केली पुर्ण!

मृणाल ठाकूरसाठी आईनं बनवलं अस्सल खान्देशी 'वांग्याचं भरीत', पाहा व्हिडीओ
मृणाल ठाकूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. मृणालने आजवर विविध हिंदी सिनेमात याशिवाय साऊथ सिनेमांमध्ये अभिनय केलाय. मृणाल ठाकूर ही मूळची धुळ्याची असून तिची खान्देश मातीशी असलेली नाळ अद्याप घट्ट आहे. मृणालला घरगुती चवीचे वांग्याचे भरीत खूपच आवडते. नुकतंच एका कार्यक्रमात मृणालला तिचा आवडता पदार्थ कोणता असं विचारल्यानंतर तिनं खानदेशी पदार्थांचं वर्णन करत वांग्याचं भरीत, वरण-बट्टी त्यावर तूप लिंबू हे पदार्थ आवडत असल्याचे सांगितलं होतं. आता तिची वांग्याचं भरीत खाण्याची इच्छा तिच्या आईनं पुर्ण केली आहे.
मृणालने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तिनं घरामध्ये सुरू असलेल्या 'वांग्याचं भरीत' आणि खान्देशी जेवणाची तयारी चाहत्यांना दाखवली आहे. आपण या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेणार असल्याचे तिने आनंदाने सांगितले. मृणालचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मृणालने अहिराणी भाषेत साधला संवाद
मृणालनं नुकतंच 'दो दिवाने सहर मै' सिनेमाच्या एका इव्हेंटला सहभागी होते. तेव्हा समोर असलेल्या एका रिपोर्टरने मृणालशी अहिराणी भाषेत संवाद साधला. ''तुले सर्वात जास्त काय आवडतं? वांग्यानं भरीत, बट्टी गोटी, वांग्यानं भाजी की शेव भाजी'?' हा प्रश्न ऐकताच मृणालला हसू आवरलं नाही. ती म्हणाली, ''काय बोली राह्यली. अडीच वाजीगयना, जेवायना शे मले. वांग्यानं भरीत पहिले. एखादी बट्ट जोडे.'' अशाप्रकारे मृणालने अहिराणी भाषेत उत्तर देऊन सर्वांना चकीत करुन सोडलं होतं. दरम्यान, 'दो दिवाने सहर मै' सिनेमा २० फेब्रुवारी २०२६ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.