मृणाल ठाकूर प्रेग्नंट? बेबी बंपसह दिसली मराठमोळी अभिनेत्री, VIDEO तुफान व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:56 IST2026-02-06T15:55:09+5:302026-02-06T15:56:22+5:30
मृणालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मृणाल ठाकूर प्रेग्नंट? बेबी बंपसह दिसली मराठमोळी अभिनेत्री, VIDEO तुफान व्हायरल
बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या तिच्या अभिनयापेक्षा वैयक्तिक आयुष्यातील चर्चांमुळे सोशल मीडियावर केंद्रस्थानी आहे. गेल्या काही दिवसांपासून साऊथ सुपरस्टार धनुष आणि मृणालच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, आता मृणालचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती 'बेबी बंप'सह दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर 'बेबी बंप'सह दिसतेय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी "मृणाल खरोखरच प्रेग्नंट आहे का?" असे प्रश्न विचारलेत. मात्र, हा व्हिडीओ मृणालच्या खासगी आयुष्याशी संबंधित नसून तिच्या व्यावसायिक कामाचा एक भाग आहे. व्हायरल झालेला हा व्हिडीओ मृणालच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा आहे.
मृणाल आणि वरुण धवन सध्या 'है जवानी तो इश्क होना है' या सिनेमावर काम करत आहेत. या चित्रपटाच्या सेटवर मृणाल एका विशिष्ट भूमिकेसाठी 'बेबी बंप' लूक मध्ये स्पॉट झाली होती. त्यामुळे ती खरोखर प्रेग्नंट नसून, हा तिच्या व्यक्तिरेखेचा एक भाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धुळ्याची कन्या विसरली नाही आपली 'अहिराणी'
दुसरीकडे, मृणालने तिच्या साधेपणाने आणि भाषेवरील प्रेमाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. मूळची धुळ्याची असलेल्या मृणालने नुकत्याच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये चक्क आपल्या मायबोलीत म्हणजेच अहिराणी भाषेत संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना तिने अस्खलित अहिराणीत उत्तरे दिली. हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठे नाव कमावूनही मृणाल आपली मुळे विसरलेली नाही, याचे कौतुक सध्या सर्वत्र होत आहे.