मृणाल ठाकूरची बहिणीसाठी भावुक पोस्ट, म्हणाली "ती माझ्या सोबत असेल, तर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 12:08 IST2026-02-22T12:07:41+5:302026-02-22T12:08:16+5:30

मृणालच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Mrunal Thakur Emotional Post For Sister Lochan Thakur | मृणाल ठाकूरची बहिणीसाठी भावुक पोस्ट, म्हणाली "ती माझ्या सोबत असेल, तर..."

मृणाल ठाकूरची बहिणीसाठी भावुक पोस्ट, म्हणाली "ती माझ्या सोबत असेल, तर..."

धुळ्याची लेक, मराठी मुलगी मृणाल ठाकुर आज हिंदीसह साउथ सिनेसृष्टीत डंका गाजवत आहे. मृणाल सोशल मीडियावर तरुणाईची क्रश बनली आहे. सध्या मृणाल आगामी 'दो दीवाने शहर मे' सिनेमामुळे चर्चेत आहे. यात तिची सिद्धांत चतुर्वेदीसोबत जोडी जमली आहे. सिनेमात सध्याच्या पिढीला आपलीशी वाटेल अशी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. अशातच मृणालच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मृणालने नुकतीच तिच्या बहिणीसाठी एक अतिशय खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं लिहलं,"ती फक्त माझी बहीण नाही, ती माझं गुप्त अस्त्र आहे. जगातील सर्वोत्तम मेकअप आर्टिस्ट आणि माझ्यामागे उभं असलेलं सर्वात मजबूत पाठबळ. ती माझ्या सोबत असेल, तर जादू होणं नक्कीच ठरलेलं आहे". मृणालच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

मृणालच्या बहिणीचं नाव लोचन ठाकूर असं आहे. लोचनने मृणालच्या काही चित्रपटांमध्ये हेअर आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. या दोघी अनेकदा फिरायला जातात. तेथील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 


 मृणालचं आहे धुळे शहरासोबत खास नातं

 मृणाल मराठी कुटुंबातील असून तिचं बालपण महाराष्ट्रातच गेलं आहे. त्यामुळे तिचं मराठीवर विशेष प्रेम आहे. इतकंच नाही तर मराठीसह तिचं खानदेशी भाषेवर विशेष प्रभुत्व असल्याचं पाहायला मिळतं. मृणाल मुळची धुळ्याची आहे. मृणालने कलाविश्वात तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'लव सोनिया', 'सुपर 30',  'बाटला हाऊस', 'जर्सी',  'सुरज्या', 'विट्टी दांडू' अशा कितीतरी हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली आहे.

Web Title : मृणाल ठाकुर का बहन के लिए भावुक पोस्ट: 'अगर वो मेरे साथ है तो...'

Web Summary : मृणाल ठाकुर ने अपनी बहन लोचन के लिए एक भावुक पोस्ट साझा किया, जिसमें उन्हें अपना गुप्त हथियार और सबसे मजबूत समर्थन बताया। लोचन ने मृणाल की कुछ फिल्मों में हेयर और मेकअप आर्टिस्ट के रूप में काम किया है। मृणाल धुले, महाराष्ट्र से हैं और उन्होंने हिंदी और दक्षिण भारतीय सिनेमा में अपना नाम बनाया है।

Web Title : Mrunal Thakur's emotional post for her sister: 'If she's with me...'

Web Summary : Mrunal Thakur shared a heartfelt post for her sister, Lochan, calling her a secret weapon and strongest support. Lochan has worked as a hair and makeup artist in some of Mrunal's films. Mrunal hails from Dhule, Maharashtra, and has made a name for herself in Hindi and South Indian cinema.