Mr & Mrs मल्होत्रा! लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले सिड-कियारा, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 17:54 IST2023-02-08T17:49:34+5:302023-02-08T17:54:39+5:30
लग्नानंतर पहिल्यांदाच मिस्टर अॅंड मिसेस मल्होत्रा एकत्र कॅमेऱ्यासमोर आले आहेत.

Mr & Mrs मल्होत्रा! लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र दिसले सिड-कियारा, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूडचे क्यूट कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) कालच लग्नबंधनात अडकले. जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर पहिल्यांदाच मिस्टर अॅंड मिसेस मल्होत्रा एकत्र कॅमेऱ्यासमोर आले आहेत. जैसलमेर विमानतळावर दोघेही दाखल झाले आणि त्यांना कॅमेऱ्यात कॅप्चर करण्यासाठी फोटोग्राफर्सची गर्दी झाली.
नववधू कियाराचा साधा लुक
अभिनेत्री कियारा अडवाणी पती सिद्धार्थ मल्होत्रासोबत जैसलमेर विमानतळावर येताच त्यांना बघण्यासाठी गर्दी झाली. दोघेही गाडीतून उतरले आणि त्यांनी हसत हसत कॅमेऱ्यासमोर पोज दिली. यावेळी नववधू कियाराचा अगदी साधा लुक दिसून आला. दोन्ही हातावर मेहंदी, बांगड्या, काळ्या रंगाचा जंपसूट, शाल अशा लुकमध्ये कियारा सुंदर दिसत होती. तर सिद्धार्थही पांढरा शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसला.
रिपोर्टनुसार सिद्धार्थ मल्होत्राच्या कुटुंबीयांनी कियारा अडवाणीच्या स्वागतासाठी खास नियोजन केले आहे. सूनबाईंचं स्वागतासाठी सिद्धार्थचे कुटुंबीय शानदार परफॉर्मन्स देणार आहेत. लग्नानंतर सिड-कियाराचं लग्नाचं रिसेप्शन ९ फेब्रुवारीला दिल्ली आणि १२ फेब्रुवारीला मुंबईत होणार आहे.