प्रत्युषाच्या आयुष्यावर बनणार चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 17:33 IST2016-04-18T12:03:51+5:302016-04-18T17:33:51+5:30
टीव्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात असताना दुसरीकडे तिच्या आयुष्यावर चित्रपट बनण्याची तयारीही सुरु झाली आहे. ...
.jpg)
प्रत्युषाच्या आयुष्यावर बनणार चित्रपट!
ट व्ही अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात असताना दुसरीकडे तिच्या आयुष्यावर चित्रपट बनण्याची तयारीही सुरु झाली आहे. याबाबतची घोषणाही करण्यात आली आहे. प्रत्युषा प्रकरणी एकापाठोपाठ एक नव नवे खुलासे होत आहेत. त्यामुळेच ‘हर पल हैं यहां धोका’ असे चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. मुकेश नारायण अग्रवाल हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. ‘तेरी फितरत’ आणि ‘इश्क बरसा दे पिया’ हे अग्रवाल यांचे दोन सिनेमे रिलीजसाठी तयार आहे. ‘हर पल हैं यहां धोखा’चे शूटींग पुढील महिन्यात सुुरू होईल. पेशाने मॉडल असलेली तनीषा ही यात प्रत्युषाची मुख्य भूमिका साकारणार आहे. तर श्रवण राघव हा प्रत्युषाचा बॉयफ्रेन्ड राहुल राजसिंह याची भूमिका साकारणार आहे. आर्यन वैद आणि साहिल प्रभाकर याचा चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गत १ एप्रिलला प्रत्युषा कथितरित्या मुंबईतील तिच्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळली होती. याप्रकरणी राहुलविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]()