मोमेंट है भाई! परिणीतीच्या नटखट अदा, राघव चढ्ढासोबतचा क्यूट व्हिडीओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 16:12 IST2023-09-26T16:09:06+5:302023-09-26T16:12:20+5:30

न्यूली मॅरिड कपलचा एक गोड व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय. 

Movement Hai Bhai! A cute video of Parineeti's naughty Ada with Raghav Chadha has come out | मोमेंट है भाई! परिणीतीच्या नटखट अदा, राघव चढ्ढासोबतचा क्यूट व्हिडीओ आला समोर

Parineeti Chopra

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा हे  (२४ सप्टेंबर) उदयपूरमधील लीला पॅलेसमध्ये  लग्नबंधनात अडकले. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत परिणीती आणि राघव यांनी सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात केली. यानंतर त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ समोर येत आहेत. या न्यूली मॅरिड कपलचा एक गोड व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होतोय. 

व्हायरल व्हिडीओमध्ये परिणीती आणि राघव यांचे क्यूट हावभाव दिसत आहेत. हा क्षण वरमाला झाल्यानंतरचा आहे. परिणीती आणि राघव लग्नानंतर फोटो काढण्यासाठी उभे राहिलेले दिसत आहेत. दोघांचं एकमेंकावरील प्रेम स्पष्टपणे चाहत्यांना पाहायला मिळतंय. एखाद्या परिकथेतील राजकुमार आणि राजकुमारीचं हे लग्न असल्याचं वाटतं आहे. दोघेही अत्यंत सुंदर आणि आनंदी असल्याचे पाहायला मिळतंय.

तर या आधी त्यांचा मंडपात एन्ट्री घेतनाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यात बेबी पिंक रंगाची छत्री घेऊन हे गोड कपल चालत येतं. तसंच दोघे गाण्यावर थिकरतात. चुलबुली परीसोबत 'आप'चे नेता राघव चड्डाही थिकरताना दिसत आहेत. 

 

लग्नानंतर आता त्यांच्या रिसेप्शन पार्टीची चर्चा सुरू आहे. हे कपल दिल्ली आणि मुंबईत रिसेप्शनही देणार आहे. दिल्लीतील रिसेप्शनला राजकीय जगतातील अनेक दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत, तर मुंबईतील पार्टीत बॉलिवूड स्टार्स  पाहायला मिळणार आहेत. तर यावर्षी मे महिन्यात परिणीती आणि राघवने साखरपुडा केला. या साखरपुड्याला बॉलिवूड इंडस्ट्री आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

Web Title: Movement Hai Bhai! A cute video of Parineeti's naughty Ada with Raghav Chadha has come out