मौनी रॉय म्हणते, आता मी आनंदाने मरू शकते...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 20:29 IST2018-11-18T20:28:49+5:302018-11-18T20:29:14+5:30
‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी मौनी रॉय लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यामुळे मौनी सध्या जाम खूश आहे.

मौनी रॉय म्हणते, आता मी आनंदाने मरू शकते...!
छोट्या पडद्यावरचे अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर नशीब आजमावतात. पण प्रत्येकालाच यश येते, असे नाही. काही भाग्यवंतानांच मोठ्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळते. अभिनेत्री मौनी रॉय त्यापैकीच एक़ बॉलिवूड पदार्पणालाचं तिला अक्षय कुमार, रणबीर कपूर, अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी मौनी रॉय लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. यामुळे मौनी सध्या जाम खूश आहे. विशेषत: बिग बींसोबत काम करण्याची संधी मिळाल्याने तर मौनी जणू हवेत आहे. होय, अमिताभ यांच्यासोबत काम केल्यानंतर आता मी आनंदाने मरू शकते, असे मौनीने म्हटले आहे. अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी, यापेक्षा चांगले काहीच घडू शकत नाही, असेही ती म्हणाली. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता, हेही मौनीने सांगितले. त्यांनी मला खास असा कुठलाही सल्ला दिला नाही. पण त्यांच्यासोबत काम करताना मी लक्ष केंद्रीत करू शकत नव्हते. कारण माझे संपूर्ण लक्ष बिग बींकडे होते. परमेश्वराने काय संधी दिली, हा एकच विचार माझ्या मनात होता. मी स्वत:ला नशीबवान समजत होते, असेही मौनी म्हणाली.
‘गोल्ड‘ हातावेगळा केल्यावर मौनीची ‘ब्रह्मास्त्र’मध्ये वर्णी लागली. याशिवाय जॉन अब्राहमच्या ‘रॉ’ आणि राजकुमारच्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटातही ती दिसणार आहे.