पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली मौनी रॉय, नेटकरी म्हणाले - "सर्जरीचं दुकान"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:07 IST2025-04-29T17:06:45+5:302025-04-29T17:07:11+5:30

Mouni Roy : मौनी रॉय पुन्हा एकदा तिच्या नवीन लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

Mouni Roy once again targeted by trolls, netizens said - ''Surgery shop'' | पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली मौनी रॉय, नेटकरी म्हणाले - "सर्जरीचं दुकान"

पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली मौनी रॉय, नेटकरी म्हणाले - "सर्जरीचं दुकान"

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या आगामी सिनेमा 'भूतनी'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान, तिने एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातला तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती पांढऱ्या सॅटिन मिनी ड्रेसमध्ये दिसली. व्हिडिओ समोर येताच, अभिनेत्री पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. युजर्सने तिला पुन्हा एकदा शस्त्रक्रिया आणि बोटॉक्स केल्याबद्दल ट्रोल केले. मात्र अभिनेत्रीने अलिकडेच दिलेल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले की तिला या सर्व गोष्टींची पर्वा नाही.

अभिनेत्रीच्या नवीन लूकचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा तिला ट्रोल केले आणि तिला शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. एका युजरने लिहिले, 'सर्जरीचं दुकान'. दुसऱ्या युजरने लिहिले, 'तुम्ही आणखी काही फिलर करून घेतले पाहिजेत, म्हणूनच तुम्हाला फ्लिक्स करावे लागतील.' आणखी एका युजरने लिहिले, 'कूल बनण्याच्या मागे, वाईट लूक फक्त बोटॉक्समुळे आला. आता तिचे नाव बोटॉक्स गर्ल आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'ते शरीरावर काहीही करतात.' तर काहींना मौनी रॉयचा लूक खूप आवडला. त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिचे कौतुकही केले. एका युजरने लिहिले, 'ती खूप सुंदर दिसत आहे.' दुसऱ्या युजरने लिहिले, 'बेबी डॉल' आणखी युजरने लिहिले, 'खूप सुंदर.'


ट्रोलिंगवर अभिनेत्री म्हणाली...
अभिनेत्री मौनी रॉयला तिला ट्रोलिंगबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली, 'मला ते दिसतही नाही. सर्वांना त्यांचे काम करू द्या. मी अशा कमेंट्सकडे लक्ष देत नाही. 'जर तुम्ही पडद्यामागे लपून इतरांना ट्रोल करत असाल आणि तुम्हाला त्यात आनंद मिळत असेल तर ते तसेच राहा.'

वर्कफ्रंट
मौनी रॉयचा आगामी हॉरर अ‍ॅक्शन-कॉमेडी चित्रपट 'द भूतनी' १ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मौनी या चित्रपटात भूताची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात संजय दत्त, सनी सिंग, पलक तिवारी, ब्युनिक आणि आसिफ खान मुख्य भूमिकेत आहेत.
 

Web Title: Mouni Roy once again targeted by trolls, netizens said - ''Surgery shop''

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.