HOTNESS ALERT: मौनी रॉयच्या हॉट अदा, बिकनी फोटो शेअर करून सोशल मीडियावर लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 15:30 IST2019-09-29T15:30:00+5:302019-09-29T15:30:02+5:30
होय, काही तासांपूर्वी मौनीने स्वत:चे बिकनी फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

HOTNESS ALERT: मौनी रॉयच्या हॉट अदा, बिकनी फोटो शेअर करून सोशल मीडियावर लावली आग
टीव्हीवरून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करणारी अभिनेत्री मौनी रॉय सध्या ‘मेड इन चायना’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला होता. याच मौनीचे बिकनी फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. होय, काही तासांपूर्वी मौनीने स्वत:चे बिकनी फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. पिंक कलरच्या बिकनीत मौनी नेहमीप्रमाणे कमालीची हॉट दिसतेय. तिच्या या हॉट फोटोंना हजारो लाइक्स मिळाले आहेत.
मौनीचे हे फोटो North Beach Sonava kiri चे आहेत. हे फोटो शेअर करताना Wonderlanding असे तिने लिहिलेय.
‘देवों का देव महादेव’ आणि ‘नागीन’ सारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेली छोट्या पडद्यावरची सर्वाधिक लोकप्रीय अभिनेत्री मौनी रॉय आता केवळ छोट्या पडद्यावरची अभिनेत्री राहिलेली नाही. आता ती बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’मधून तिचा बॉलिवूड डेब्यू झाला. विशेष म्हणजे, पहिलाच डेब्यू चित्रपट सुपरडुपर हिट झाला. या चित्रपटानंतर मौनीचे चांगलेच भाव वाढले आहेत. इतके की, आता छोट्या पडद्यावर काम न करण्याचा निर्णय तिने घेतलाय. लवकरच ती रणबीर-आलिया स्टारर ‘ब्रह्मास्त्र’ मध्ये झळकणार आहे. याशिवाय राजकुमारचा ‘मेड इन चायना’ या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत आहे.
मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये कंटेस्टंट म्हणून ती सहभागी झाली होती. देवों के देव महादेव, बिग बॉस 8 अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे.