९ दिवस रुग्णालयात दाखल होती मौनी रॉय, तब्येतीबाबत म्हणाली, 'मोठ्या विश्रांतीनंतर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 04:20 PM2023-07-23T16:20:49+5:302023-07-23T16:21:25+5:30

मौनीने चाहत्यांसोबत आपल्या तब्येतीविषयी माहिती शेअर केली आहे.

mouni roy got discharge from hospital after 9 days says i am grateful shared pic with husband | ९ दिवस रुग्णालयात दाखल होती मौनी रॉय, तब्येतीबाबत म्हणाली, 'मोठ्या विश्रांतीनंतर...'

९ दिवस रुग्णालयात दाखल होती मौनी रॉय, तब्येतीबाबत म्हणाली, 'मोठ्या विश्रांतीनंतर...'

googlenewsNext

एकता कपूरच्या 'नागिन' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) नुकतीच रुग्णालयातून परत आली आहे. तिला नेमकं काय झालं होतं, कशामुळे ती रुग्णालयात दाखल झाली याबद्दल मात्र तिने काहीच माहिती दिलेली नाही. मौनी पती सूरज नांबियारसोबत दुबईत आलिशान आयुष्य जगते. मात्र आज अचानक ९ दिवसांनी घरी पर आल्याची पोस्ट तिने शेअर केली. तसंच हाताला लावलेल्या सलाईनचा फोटोही पोस्ट केला. यामुळे चाहते चिंतेत पडले.

मौनीने चाहत्यांसोबत आपल्या तब्येतीविषयी माहिती शेअर केली आहे. हाताला सलाईन असलेला फोटो आणि नवऱ्यासोबतचा एक सेल्फी शेअर करत तिने लिहिले, '९ दिवस रुग्णालयात होते आणि मोठ्या विश्रांतीनंतर आता मला शांत वाटतंय मी स्वत:ला खूप नशीबवान समजते. मला हे सांगायला आनंद होतोय की मी घरी आले आहे आणि हळू हळू पण खूप चांगल्या प्रकारे माझी तब्येत सुधारत आहे. एक आनंदी आणि निरोगी आयुष्य महत्वाचं आहे. माझ्या सर्व मित्रपरिवाराचे मी आभार मानते ज्यांनी माझी काळजी घेतली. माझ्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून खूप प्रेम दिलंत.' मौनीने नवऱ्यासाठी शेवटी लिहिलं, 'तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. मी नेहमीच आभारी असेन.'

मौनीच्या पोस्टवर तिची जवळची मैत्रिण आणि अभिनेत्री दिशा पटानीने कमेंट करत लिहिले, 'awwww लवकर बरी हो माझी मौनी. आय लव्ह यू.' तर मृणाल ठाकूरने लिहिले, 'काय झालं? तू ठिक तर आहेस? लवकर बरी हो माझी डॉल'. मौनी शेवटचं ब्रह्मास्त्र सिनेमात दिसली. तर नुकतंच तिने मुंबईत स्वत:चं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. ज्याचं नाव 'बदमाश' असं आहे.

 

Web Title: mouni roy got discharge from hospital after 9 days says i am grateful shared pic with husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.