Mouni Roy Birthday: मौनीने रॉयने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती करिअरची सुरुवात, जाणून घ्या काही खास गोष्टी

By गीतांजली | Updated: September 28, 2020 18:15 IST2020-09-28T18:06:42+5:302020-09-28T18:15:18+5:30

मौनी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Mouni roy birthday special know unknown facts about her | Mouni Roy Birthday: मौनीने रॉयने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती करिअरची सुरुवात, जाणून घ्या काही खास गोष्टी

Mouni Roy Birthday: मौनीने रॉयने बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती करिअरची सुरुवात, जाणून घ्या काही खास गोष्टी

अभिनेत्री मौनी रॉयने आपले सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर छोटा पडद्यासह सिल्वर स्क्रिनवरही चाहत्यांनी मनं जिंकली आहेत. मौनीने बॉलिवूडच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 साली पश्चिम बंगालच्या कूच बिहारमध्ये झाला. मौनी छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. 

बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली सुरुवात 
मौनीला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. शालेय शिक्षण मौनीने पश्चिम बंगालमधून घेतले. यानंतर तिने दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केले. मौनीच्या चाहत्यांना वाट तिने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरुन केली मात्र असे नाही आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा अभिषेक बच्चन आणि भूमिका चावल्याचा रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती. 

एकता कपूरच्या क्योंकि सास भी कभी बहू थी मालिकेत दिसली होती. यात तिने कृष्णा तुलसीची भूमिका तिने साकारली होती. या मालिकेतील तिची भूमिका  प्रचंड आवडली होती. यानंतर मौनीने 'नागिन', 'नागिन 2', 'कस्तूरी', 'जुनून-ऐसी नफरत' अशा मालिकेंमध्ये दिसली होती. 2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे. 

मौनी रॉयचे स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल, See latest Pics

मौनी रॉयच्या बिकिनीतील या ग्लॅमरस फोटोने वेधलं सर्वांचं लक्ष, कॅप्शन लिहिलं - श्वास घ्या, श्वास सोडा!

 

Web Title: Mouni roy birthday special know unknown facts about her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.