Mother's Day : ...या आहेत बॉलिवूडच्या मोस्ट स्टायलिश मॉम्स !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2017 15:20 IST2017-05-14T09:50:25+5:302017-05-14T15:20:25+5:30
सेलिब्रिटी जेवढे त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात, तेवढेच त्यांच्या पर्सनल लाइफवरूनही ते चर्चेत असतात. त्यातच मुलांमुळे या सेलिब्रिटींना जणू काही ...

Mother's Day : ...या आहेत बॉलिवूडच्या मोस्ट स्टायलिश मॉम्स !
जेनेलिया डिसूजा
जेनेलिया डिसूजा बॉलिवूडमधील क्युट आणि ग्लॅमर अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्या तिने चित्रपटातून ब्रेक घेतला असला तरी, आपल्या कौटुंबिक आयुष्यावरून ती नेहमीच चर्चेत असते. जेनेलिया दोन मुलांची आई असून, आपली ग्लॅमरस लाइफ सांभाळताना ती मुलांचा सांभाळ करीत असते.
सुष्मिता सेन
मोस्ट स्टायलिश मॉम म्हणून अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्याकडे बघितले जाते. सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतलेले असून, आपले करिअर सांभाळताना ती मुलींचाही सांभाळ तेवढ्याच ममतेने करते. मिस युनिव्हर्स राहिलेल्या सुष्मिताला स्टायिलश अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
श्रीदेवी
एकेकाळची बॉलिवूडची टॉपची अन् मोस्ट स्टायलिश राहिलेली अभिनेत्री श्रीदेवी आजही तेवढीच स्टायलिश आहे. श्रीदेवीला दोन मुली असून, तिच्या ग्लॅमरमधील अंदाज तसूभरही कमी झालेला नाही. श्रीदेवीची जान्हवी नावाची मुलगी लवकरच बॉलिवूड डेब्यू करण्याची शक्यता आहे.
करिना कपूर
बॉलिवूडची हॉट मॉम म्हणून करिना कपूरला ओळखले जाते. करिना आपला मुलगा तैमूरसोबत पहिलाच मदर्स डे सेलिब्रेट करीत आहे. प्रेग्नेंसीनंतर करिनाचे वजन खूप वाढले होते. मात्र तिने आपल्या फिटनेसकडे अधिक लक्ष देत पहिल्यासारखेच फिगर प्राप्त केले आहे. सध्या ती पुन्हा एकदा इंडस्ट्रीकडे वळली असून, आपल्या मुलाचा सांभाळही तेवढ्याच तत्परतेने करताना बघावयास मिळते.
मलाइका अरोरा
बॉलिवूडची आयटम गर्ल म्हणून मलाइका अरोरा हिला ओळखले जाते. मलाइका खूपच हॉट असून, दोन मुलांची आई आहे. अशातही तिने आपले फिगर मेंटेण्ड ठेवला आहे. आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात मलाइका आघाडीवर आहे.
ऐश्वर्या राय-बच्चन
विश्वसुंदरीचा किताब प्राप्त केलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला सुपर मॉम्स म्हणून ओळखले जाते. ऐश्वर्या मुलगी आराध्या हिच्याविषयी खूपच पझेसिव्ह असून, तिचा सांभाळ करणे हीच तिची प्राथमिकता असल्याचे तिने दाखवून दिले आहे.
शिल्पा शेट्टी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिलादेखील स्टायलिश मॉम म्हणून ओळखले जाते. आपले करिअर अन् प्रॉडक्शन हाउस सांभाळताना तिने मुलालादेखील तेवढाच वेळ देत असते. आजही शिल्पाने तिचा फिगर मेंटेण्ड ठेवला आहे.