'वेड'नेस फॉरेव्हर! महाराष्ट्राच्या लाडक्या कपलचं रोमँटिक फोटोशूट, चाहत्यांनीही केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 15:17 IST2023-11-20T15:17:13+5:302023-11-20T15:17:54+5:30
रितेश देशमुख आणि जिनिलिया ही प्रेक्षकांची ऑल टाईम फेवरेट जोडी आहे.

'वेड'नेस फॉरेव्हर! महाराष्ट्राच्या लाडक्या कपलचं रोमँटिक फोटोशूट, चाहत्यांनीही केलं कौतुक
मिस्टर आणि मिसेस देशमुख म्हणजेच मराठीतील सुपरक्युट जोडी. महाराष्ट्राचा मुलगा आणि वहिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. 2012 मध्ये रितेश (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) लग्नबंधनात अडकले. इतक्या वर्षांनंतरही त्यांच्यातील प्रेम आणखी बहरत जात आहे. ते दिवसेंदिवस आणखी तरुणच होत आहेत. नुकतंच दोघांनी सोशल मीडियावर सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केलेत. त्यांच्यातील प्रेमाचं 'वेड' फोटोतून स्पष्टपणे झळकतंय.
रितेश देशमुख आणि जिनिलिया ही प्रेक्षकांची ऑल टाईम फेवरेट जोडी आहे. त्यांचा साधेपणा ही तर त्यांची खासियत आहे. तसंच जिथे जातील तिथे ते लोकांचं मन जिंकतात. नुकतंच सेलिब्रिटी फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी रितेश जिनिलियाचे रोमँटिक फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. ब्लॅक अँड व्हाईट थीममधील हे फोटो लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंवर चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
रितेश देशमुखने पोस्ट केलेल्या फोटोला 'वेड'नेस फॉरेव्हर' असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, रितेश आणि जिनिलीयाने २ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्नाच्या बेडीत अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. लग्नानंतर दोन वर्षांनी जिनिलीयाने रियान या त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर २०१६ साली ती दुसऱ्यांदा आई झाली. त्यांच्या छोट्या लेकाचं नाव राहील असं आहे.