मॉम टू बी...!! सुरवीन चावलाचा पार पडला बेबी शॉवर, See Photos
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 20:00 IST2019-03-06T20:00:00+5:302019-03-06T20:00:00+5:30
बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला सध्या तिचा प्रेग्नेसी टाइम एन्जॉय करते आहे. नुकताच तिचा बेबी शॉवर पार पडला.

मॉम टू बी...!! सुरवीन चावलाचा पार पडला बेबी शॉवर, See Photos
बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावला सध्या तिचा प्रेग्नेसी टाइम एन्जॉय करते आहे. ती कामापासून दूर असली तरीदेखील इंस्टाग्रामवर ती आपले फोटो शेअर करत असते. नुकताच तिचा बेबी शॉवर पार पडला. या कार्यक्रमात ती वेगवेगळ्या अंदाजात पाहायला मिळाली.
सुरवीनने इंस्टाग्रामवर बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. सुरवीन प्रेग्नेंट असल्यापासून ड्रेस व गाऊनमध्ये दिसली आहे. मात्र डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात तिने रॉ मॅगोची पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. त्यात पिंक रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला होता. त्यावर ज्वेलरीदेखील घातली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसत होती.
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
तसेच ती आणखीन एका लूकमध्ये दिसली. त्यात तिने पिच रंगाचा गाऊन परिधान केला होता. त्यात देखील ती ग्लॅमरस दिसत होती.
सुरवीनने 2015 साली अक्षय ठक्करसोबत विवाह केला. मात्र ही गोष्ट तिने बराच काळ गुलदस्त्यात ठेवली होती. त्यानंतर 2017 साली तिने इंस्टाग्रामवर आपल्या लग्नाचा फोटो शेअर करून हे वृत्त सांगितले होते. सुरवीनने छोट्या पडद्यावरून सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवले. मालिकेत काम केल्यानंतर हेट स्टोरी 2 व पार्च्ड या चित्रपटात तिने काम केले.