“ना कजरे की धार, ना मोतीयों का हार" गाण्यातील सोज्वळ अभिनेत्री आता दिसते ग्लॅमरस, तिला ओळखणं जातंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 17:49 IST2023-11-02T17:46:51+5:302023-11-02T17:49:46+5:30
अभिनेत्रीच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे.

“ना कजरे की धार, ना मोतीयों का हार" गाण्यातील सोज्वळ अभिनेत्री आता दिसते ग्लॅमरस, तिला ओळखणं जातंय कठीण
“ना कजरे की धार, ना मोतीयों का हार''.....'मोहरा' सिनेमातील हे गाणे तुफान गाजले होते. बघावे त्याच्या तोंडावर हे गाणे रुळायचे. सुनिल शेट्टी आणि पुनम झावर हे गाणे चित्रीत केले गेले होते. बालपणापासूनच पूनम झावरला मॉडेलिंगची आवड होती. मुंबईत लहानाची मोठी झालेल्या पुनमने अभिनयाच्या सुरूवातीला मॉडेलिंग करायला सुरू केली. अनेक बड्या ब्रँडच्या जाहीरातींमध्ये ती झळकली. एका मॅक्झिनच्या कव्हरवर देखील तिला झळकण्याची संधी मिळाली. आणि याच मॅगेझिनने तिला सिनेमात काम करण्याची संधी मिळवून दिली.
प्रोड्युसर गुलशन रॉय कपूर यांच्या टेबलावर हे मॅगझिन पडले होते. एका छोट्या सिनसाठी म्हणून त्यांनी पूनमला साईन केलं. तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेचं तिने संधीचं सोनं केलं. या गाण्यामुळे पूनम प्रकाशझोतात आली.त्यानंतर पुनमने प्रोड्युसर बनायचे ठरवले.'आंच'नावाचा सिनेमाची तिने निर्मिती केली. नानाटेकर आणि परेश रावल या दोघांमुळे हा सिनेमाही हिट ठरला. अक्षय कुमारचा 'ओह माय गॉड' सिनेमात राधे माँ प्रमाणे अवतार केलेली पात्र साकारणारी अभिनेत्री होती पूनम झावर. सिनेमात अगदी छोट्या भूमिकेत ती झळकली होती.
पूनमने प्लॅस्टिक सर्जरीही केली आहे. त्यामुळेही तिच्या लूकमध्ये खूप बदल झाला आहे. अतिशय बोल्ड स्वरूपातील फोटोशूट करत ती सोशल मीडियावर शेअर करते. मोहरा सिनेमात सोज्वळ अंदाजात दिसणारी पूनम आज खूप बदलली आहे. तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज पाहून आश्चर्याचा धक्का नाही लागला तर नवलच.