मोहित मारवाहच्या लग्नानंतर या कारणासाठी दुबईत थांबल्या होत्या श्रीदेवी...समोर आले खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 11:34 IST2018-02-27T06:04:25+5:302018-02-27T11:34:25+5:30

श्रीदेवी भाचा मोहित मारवाहचे लग्न समांरभात सहभागी होण्यासाठी दुबईत गेल्या होत्या. मात्र लग्नसोहळा संपल्यानंतर ही त्या दुबईतच थांबल्या होत्या. ...

Mohit marwah was stopped in Dubai for this purpose after the wedding. Sridevi ... came in front of me because the reason | मोहित मारवाहच्या लग्नानंतर या कारणासाठी दुबईत थांबल्या होत्या श्रीदेवी...समोर आले खरं कारण

मोहित मारवाहच्या लग्नानंतर या कारणासाठी दुबईत थांबल्या होत्या श्रीदेवी...समोर आले खरं कारण

रीदेवी भाचा मोहित मारवाहचे लग्न समांरभात सहभागी होण्यासाठी दुबईत गेल्या होत्या. मात्र लग्नसोहळा संपल्यानंतर ही त्या दुबईतच थांबल्या होत्या. मात्र नेमक्या त्या दुबईत का थांबल्या हा प्रश्न आता चारही बाजूंनी विचारण्यात येतो. मात्र आता श्रीदेवींचे दुबईत थांबण्या मागचे कारण समोर आले आहे. श्रीदेवी जितक्या चांगल्या डान्सर होत्या त्या तेवढ्याच चांगल्या चित्रकारदेखील होत्या. मोहित मारवाहच्या लग्नानंतर त्यांचे पेटिंग्जचे प्रदर्शन लागणार होते. याकारणासाठी त्या दुबईतच थांबल्या आणि नवरा आणि छोटी मुलगी खुशी भारतात परत आली. 
    
श्रीदेवी यांच्या चित्रांची निलामी होणार होती आणि म्हणून त्या तिथेच थांबल्या होत्या. त्यांनी दोन चित्र काढली होती. त्यातले एक चित्र सोनम कपूरचा पहिला चित्रपट सांवरियामध्ये तिने दिलेल्या पोझवर काढले होते तर दुसरे चित्र प्रसिद्ध डान्सर मायकल जैक्सन यांचे होते.   

मोहित मारवाह यांच्या लग्नासाठी गेलेल्या श्रीदेवी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी या भयंकर प्रसंगाची कधी कल्पना ही केली नसेल. मात्र त्यांच्यावर काळाने असा घात घातला कि 24 फेब्रुवारीला सगळे होत्याचे नव्हते झाले. श्रीदेवींनी या जगाचा निरोप घेतला. अजूनही त्यांचे पार्थिव भारतात आणण्यात आले नाहीयं. मृत्यूनंतर श्रीदेवी यांच्या  पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. फॉरेन्सिक अहवालात त्यांचा मृत्यू  कार्डिअॅक अरेस्टमुळे नाही तर बाथटबमध्ये बुडून झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे गरज पडल्यास पुन्हा एकदा त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे समजते आहे. 

ALSO READ :  श्रीदेवींचे पार्थिव भारतात येण्यास होऊ शकतो विलंब! प्रकरणातील गुंता वाढला!!

श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. १९६७ साली एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवले होते.

Web Title: Mohit marwah was stopped in Dubai for this purpose after the wedding. Sridevi ... came in front of me because the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.