मोहित मारवाह पत्नीसह पोहोचला अनिल कपूरच्या घरी, यांच्याच लग्नासाठी श्रीदेवी गेल्या होत्या दुबईला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 14:57 IST2018-02-27T09:27:30+5:302018-02-27T14:57:50+5:30

मोहित मारवाह आणि अंतरा मोतीवाला यांच्या लग्नासाठी दुबई येथे पोहोचल्या होत्या. हे दोघेही श्रीदेवी यांच्या मुलींचे सांत्वन करण्यासाठी अनिल कपूरच्या घरी पोहोचले.

Mohit Marwah reached wife with Anil Kapoor's house, Sridevi went to Dubai for marriage! | मोहित मारवाह पत्नीसह पोहोचला अनिल कपूरच्या घरी, यांच्याच लग्नासाठी श्रीदेवी गेल्या होत्या दुबईला!

मोहित मारवाह पत्नीसह पोहोचला अनिल कपूरच्या घरी, यांच्याच लग्नासाठी श्रीदेवी गेल्या होत्या दुबईला!

लिवूडच्या सुपरस्टार श्रीदेवी यांच्या निधनामुळे बॉलिवूडकरांना जबरदस्त धक्का बसला असून, अजूनही त्यांना या धक्क्यातून सावरणे अवघड होताना दिसत आहे. गेल्या शनिवारी रात्रीच्या सुमारास दुबईतील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये पडून श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. सध्या त्यांच्या मृत्यूची दुबई पोलिसांकडून चौकशी केली जात असल्याने त्यांचे पार्थिव मुंबईत आणण्यास प्रचंड विलंब होत आहे. श्रीदेवी यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील मोठमोठे दिग्गज सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते श्रीदेवीचे दीर अनिल कपूर यांच्या घरी हजेरी लावत आहेत. श्रीदेवी यांच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी काका अनिल कपूरकडे असून, त्यांचे सांत्वन करण्यासाठी सेलिब्रिटींची सध्या रीघ लागली आहे. यामध्ये सोमवारी श्रीदेवी यांचा पुतण्या अभिनेता मोहित मारवाह आणि पत्नी अंतरा मोतीवाला हे दोघेदेखील अनिल कपूर यांच्या घरी पोहोचले होते. या दाम्पत्याच्या लग्नासाठीच श्रीदेवी दुबई येथे पोेहोचल्या होत्या. 



गेल्या १८ फेब्रुवारी रोजी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशीसोबत मोहित आणि अंतराच्या लग्नासाठी मुंबईहून दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवी आणि त्यांचा परिवार लग्नसोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी श्रीदेवी यांनी हा सोहळा खूप एन्जॉय केल्याचे फोटोंवरून समोर येते. वेडिंग फंक्शन पूर्ण झाल्यानंतर श्रीदेवी दुबईलाच थांबल्या होत्या. तर पती बोनी आणि खुशी मुंबईत परतले होते. त्यानंतर पुन्हा बोनी दुबईला पोहोचले अन् ही घटना समोर आली. 



दरम्यान, सोमवारी मोहित आणि अंतरा श्रीदेवी यांच्या दोन्ही मुलींचे सांत्वन करण्यासाठी अनिल कपूरच्या घरी पोहोचले होते. यावेळी मोहितचा मोठा भाऊ अक्षय मारवाह आणि त्याची पत्नी अशिता रेलन हेदेखील उपस्थित होते. दुबईपासून १२० किलोमीटर अंतरावर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिशय धुमधडाक्यात मोहित आणि अंतराचे लग्न पार पडले. या लग्नसोहळ्यात कपूर खानदानासह बी-टाउनमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होत्या. 
 

श्रीदेवी, बोनी कपूर, अनिल कपूर, अर्जुन कपूर, सोनम कपूर, शनाया कपूर यांच्यासह करण जोहर, डिझायनर मनिष मल्होत्रा, श्वेता बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आदींनी या लग्नसोहळ्यात हजेरी लावली होती. 

Web Title: Mohit Marwah reached wife with Anil Kapoor's house, Sridevi went to Dubai for marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.