​ ‘ऐ दिल...’ वर भडकले मोहम्मद अजीज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2016 14:47 IST2016-10-31T14:47:17+5:302016-10-31T14:47:17+5:30

करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट काल-परवा रिलीज झाला. पण अजूनही चित्रपटाशी संबंधित वाद संपलेले नाहीत. चित्रपटातील ...

Mohammed Aziz barked on 'Ai Dil ...' | ​ ‘ऐ दिल...’ वर भडकले मोहम्मद अजीज!

​ ‘ऐ दिल...’ वर भडकले मोहम्मद अजीज!

ण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट काल-परवा रिलीज झाला. पण अजूनही चित्रपटाशी संबंधित वाद संपलेले नाहीत. चित्रपटातील एका संवादाने ‘खुदा गवाह’फेम गायक मोहम्मद अजीज यांचा राग ओढवून घेतला आहे. मोहम्मद अजीज यांनी फेसबुकवरून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात ‘मोहम्मद रफी गाता कम था और रोता ज्यादा था’ असा एक संवाद आहे. या संवादामुळे मोहम्मद अजीज नाराज झाले आहेत. फेसबुकवर एक व्हिडिओ अपलोड करून त्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे. ‘हा डायलॉग नक्कीच कुण्या तरी मूर्खाने लिहिला असावा. पण करण जोहर ज्यांना मी अतिशय विद्वान समजायचो, त्यांनी तो पास करावा आणि चित्रपटात घ्यावा,याचेच मला आश्चर्य वाटते. पार्श्वगायनाचा पाया रचणाºया महान गायकाची अशाप्रकारे टर उडवणे संतापजनक आहे. रफी साहेबांनी काय-काय गायले नाही. ‘हम काले हैं तो क्या हुआ..’, ‘चाहे कोई मुझे जंगली कहे..’,‘ ये चांद सा रोशन चेहरा..’ ही गाणी यांना रडकी वाटतात का? रफी साहेबांनी प्रत्येक मूड आणि अनेक भाषेतील २६ हजारांपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आजपर्यंत कुणीही त्यांच्या गाण्यांवर बोट उचवले नाही. लता मंगेशकर, आशा भोसले, मन्ना डे यासारखे महान गायक त्यांची प्रशंसा करताना थकत नाहीत, असे त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. सोबतच करण जोहरलाही फैलावर घेतले आहे. करण साहेब तुमचे वडील रफी साहेबांचे भक्त होते. त्यांच्या गाण्यावर मनापासून प्रेम करायचे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही माझ्यासकट रफी साहेबांवर प्रेम करणाºया कोट्यवधी श्रोत्यांचे मन दुखावले आहे. कुणी एक तुमचा चित्रपट पाहणार नसेल, तर त्याने तुम्हाला काहीही फरक पडत नाही, हे मला ठाऊक आहे. पण आजनंतर मी कधीही तुमचा चित्रपट पाहणार नाही. आधी संगीताबद्दल जाणून घ्या, मग बोला, असे त्यांनी सुनावले आहे.





Web Title: Mohammed Aziz barked on 'Ai Dil ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.