वयाच्या 46 व्या वर्षी बोल्डनेसमुळे चर्चेत येतीये 'ही' अभिनेत्री,लग्नानंतर 6 वर्षातच मोडला होता संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 09:56 IST2026-02-10T09:55:01+5:302026-02-10T09:56:09+5:30
Bollywood actress: या अभिनेत्रीने केनियाच्या एका बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली होती.

वयाच्या 46 व्या वर्षी बोल्डनेसमुळे चर्चेत येतीये 'ही' अभिनेत्री,लग्नानंतर 6 वर्षातच मोडला होता संसार
बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक तरुणींनी त्यांचं नशीब आजमावलं. यात काही यशस्वी ठरल्या तर काही अयशस्वी ठरल्या. मात्र, यामध्ये अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या करिअरपेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत राहिल्या. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. ही अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्य आणि लव्हलाइफमुळे प्रचंड चर्चेत आली. इतकंच नाही तर वयाच्या ४६ व्या वर्षी ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत आहे.
शाहरुख खानची (Shah rukh Khan) मुख्य भूमिका असलेला मोहब्बतें हा सिनेमा तर सगळ्यांच्याच लक्षात असेल. हा सिनेमा त्या काळी प्रचंड गाजला होता. मल्टीस्टारर असलेल्या या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री किम शर्मा (Kim Sharma) हिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. किम सध्या कलाविश्वात फारशी सक्रीय नसली तरी सुद्धा तिचं वैयक्तिक आयुष्य मात्र कायम चर्चेत येत असतं.
अवघ्या ६ वर्षात मोडला किमचा संसार
किमने केनियाच्या बिझनेसमन अली पुंजानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर किम केनियाला शिफ्ट झाली. मात्र, लग्नाच्या अवघ्या सहा वर्षात तिने अली पुंजानीसोबत काडीमोड घेतला. २०१७ मध्ये तिने कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. त्या काळी किमला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता असंही म्हटलं जातं. किमने घटस्फोटानंतर फॅशन डिझायनर अर्जुन खन्नाला डेट केलं. मात्र, हे नातं सुद्धा फार काळ टिकलं नाही.
युवराज सिंहला केलं होतं डेट
लग्नापूर्वी किमने प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंहला डेट केलं होतं असं म्हटलं जातं. जवळपास ४ वर्ष युवराज आणि किम रिलेशनशीपमध्ये होते. मात्र, २००७ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. युवराजच्या आईला हे नातं मान्य नसल्याचं त्याकाळी म्हटलं जात होतं.
४ वेळा मोडला साखपुडा
सुत्रांच्या माहितीनुसार, किम आणि युवराज यांचं एकमेकांवर प्रेम असल्यामुळे ते लग्नगाठ बांधणार होते. इतकंच नाही या दोघांनी जवळपास ४ वेळा साखरपुडा केला होता. मात्र, युवराजच्या आईला हे नात मान्य नसल्यामुळे क्रिकेटपटूने या नात्याला पूर्णविराम देण्याचं ठरवलं.
दरम्यान, किमने 'मोहब्बते'नंतर 'नहले पे दहला', 'मर गया गुड खाके', 'फिदा', 'मनी हैं तो हनी हैं', 'तुमसे अच्छा कौन हैं' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यास ती अशस्वी ठरली. किम सध्या कोणत्याही सिनेमात दिसत नसली तरीदेखील सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे. इतकंच नाही तर वयाच्या ४६ व्या वर्षी ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत येत असते.