अर्जुन रामपालची पहिली पत्नी आहे मॉडेल, आजही दिसते इतकी सुंदर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 13:04 IST2019-11-30T12:55:54+5:302019-11-30T13:04:44+5:30
1986 मध्ये तिने फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकला आहे.

अर्जुन रामपालची पहिली पत्नी आहे मॉडेल, आजही दिसते इतकी सुंदर
मॉडल मेहर जेसिकाचा आज बर्थडे आहे. मेहरा अभिनेता अर्जुन रामपालची पहिली पत्नी आहे. अर्जुन आणि मेहरने काही दिवसांपूर्वीत घटस्फोट झाला. अर्जुन व मेहर यांनी सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मेहरने 1980 मध्ये करिअरला मॉडल म्हणून सुरुवात केली. 1986 मध्ये ती फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकली. 1998मध्ये तिने अर्जुन रामपालशी लग्न केले. अर्जुन व मेहर यांनी 30 एप्रिल 2019 रोजी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. सहा महिन्यानंतर दोघांनाही कायदेशीर घटस्फोट देण्यात आला.
अर्जुन व मेहर यांना दोन मुली आहेत. घटस्फोटानंतर या दोन्ही मुली त्यांच्या आईकडे म्हणजेच मेहरकडे राहतील. 2011 पासून अर्जुन व मेहर यांच्या संसारात कुरबुरी सुरु झाल्या होत्या. अखेर 2018 मध्ये दोघांनीही एकमेकांपासून विभक्त होत असल्याचे जाहिर केले होते. यानंतर अर्जुन भाड्याच्या घरात शिफ्ट झाला होता. 1998 मध्ये अर्जुन व मेहर यांचे लग्न झाले होते. लग्नाच्या 20 वर्षांनंतर 28 मे 2018 रोजी दोघींनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.
मेहरसोबत बिनसले असतानाच अर्जुन गॅ्रबिएलाच्या प्रेमात पडला होता. 2009 मध्ये आयपीएल आॅफ्टर पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली होती. हळूहळू दोघांत मैत्री झाली आणि नंतर प्रेम. जेसिकापासून विभक्त झाल्यावर अर्जुन ग्रॅबिएलासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागला. ग्रॅबिएला एक आफ्रिकी मॉडेल आहे. ह्यसोनाली केबलह्ण या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता.