300 किमी पायी चालत जाऊन 'इथे' पुन्हा मिलिंद-अंकिताने केलं लग्न, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 16:07 IST2018-07-14T16:06:28+5:302018-07-14T16:07:00+5:30

लग्नाच्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं होतं. आता पुन्हा एकदा मिलिंद आणि अंकिताने लग्न केलं आहे. पण यावेळी त्यांनी भारताबाहेर पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये लग्न केलं. 

Model-Actor Milind Soman and Ankita Konwer again got married | 300 किमी पायी चालत जाऊन 'इथे' पुन्हा मिलिंद-अंकिताने केलं लग्न, फोटो व्हायरल

300 किमी पायी चालत जाऊन 'इथे' पुन्हा मिलिंद-अंकिताने केलं लग्न, फोटो व्हायरल

मुंबई : मिलिंद सोमण आणि अंकिता कोंवर यांचं लग्न महिन्यांपूर्वी चांगलंच चर्चेत होतं. त्यांच्या लग्नाच्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायचं होतं. आता पुन्हा एकदा मिलिंद आणि अंकिताने लग्न केलं आहे. पण यावेळी त्यांनी भारताबाहेर पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये लग्न केलं. 

मिलिंद सोमण आणि अंकिताने त्यांच्या इन्स्टाग्रावर या लग्नाचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, 'जंगलात वाहणाऱ्या धबधब्याखाली लग्न करण्याचं स्वप्न होतं'. मिलिंदच्या या दुसऱ्यांदा झालेल्या लग्नासाठी त्याच्या परिवारातील लोकही सोबत होते. या फोटोंमध्ये दोघेही ख्रिश्चन वेडिंग लूकमध्ये दिसत आहे. 

मिलिंदचे अकिंतासोबत लग्न करण्याआधी अनेक अफेअर होते. त्याचं मधु सप्रे, दिपानिता शर्मा, गुल पनाग, शहाना गोस्वामी यांच्यासोबत अफेअर होतं. 

मिलिंद सध्या फिटनेससंबंधी वेगवेगळ्या संस्थासाठी काम करतो आहे. त्यासोबतच गेल्या वर्षी तो 'शेफ' सिनेमातही दिसला होता.   

Web Title: Model-Actor Milind Soman and Ankita Konwer again got married