​मनसेने थांबविले ‘फोर्स २’ चे शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 19:41 IST2016-04-22T14:11:17+5:302016-04-22T19:41:17+5:30

महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ‘फोर्स चित्रपटाचे शूटिंग बंद पाडले. वर्क परमिट नसताना परदेशी कलाकार चित्रपट करीत असल्याने शूटिंग थांबविले. मनसेच्या ...

MNS stopped shooting for 'Force 2' | ​मनसेने थांबविले ‘फोर्स २’ चे शूटिंग

​मनसेने थांबविले ‘फोर्स २’ चे शूटिंग

ाराष्टÑ नवनिर्माण सेनेने ‘फोर्स चित्रपटाचे शूटिंग बंद पाडले. वर्क परमिट नसताना परदेशी कलाकार चित्रपट करीत असल्याने शूटिंग थांबविले. मनसेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ३५ परदेशी कलाकारांनाही ताब्यात घेतलं आहे. 

गोरेगावच्या ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजात ‘फोर्स २’ चित्रपटाचे शूटिंग सुरू होतं. संबंधित कलाकारांकडे टुरिस्ट व्हिसाही नसल्याने उघड झालं आहे. त्यानंतर या कलाकारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर संबंधीत देशाच्या दुतावासाशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येईल. 

मनसेने चित्रपटाचं शूटिंग बंद पाडलं, त्यावेळी चित्रपटात भूमिका साकारणारा अभिनेता जॉन अब्राहमही सेटवर हजर होता. विपूल शाह यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली आहे. 

Web Title: MNS stopped shooting for 'Force 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.