मिथूनची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री !!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 12:32 IST2016-09-01T07:02:08+5:302016-09-01T12:32:08+5:30
मिथूनची लाडकी मुलगी दिशानी सध्या न्यूयॉर्कमध्ये फिल्म अकॅडमीत अभिनयाचे धडे शिकत असून लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. दिशानी ...

मिथूनची मुलगी बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री !!!
मिथून दांची ही लाडकी लेक आता मोठी झाली असून सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते. मात्र दिशानी ही मिथून दांची दत्तक मुलगी असल्याचे तुम्हाला माहित आहे का... दिशानी अगदी तान्ही असताना कोलकाता शहराबाहेरील एका कचराकुंडीत सापडल्याचे म्हटले जाते. तिलाच मिथून दांनी दत्तक घेऊन आपले नाव दिले. इतकेच नाही तर तीन मुलांइतकाच संपत्तीत वाटा दिल्याचेही म्हटले जाते.