'बॅड बॉय'मधून मिथुन चक्रवर्ती यांच्या लेकाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 04:02 PM2023-04-15T16:02:56+5:302023-04-15T16:03:28+5:30

Namashi Chakraborty : हिंदी सिनेसृष्टीतील डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती बॉलिवूडमध्ये आपली इनिंग सुरू करणार आहे.

Mithun Chakraborty's son entry in Bollywood from 'Bad Boy', the trailer of the film has been released | 'बॅड बॉय'मधून मिथुन चक्रवर्ती यांच्या लेकाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

'बॅड बॉय'मधून मिथुन चक्रवर्ती यांच्या लेकाची बॉलिवूडमध्ये एन्ट्री, चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज

googlenewsNext

हिंदी सिनेसृष्टीतील डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा मुलगा नमाशी चक्रवर्ती (Namashi Chakraborty) बॉलिवूडमध्ये आपली इनिंग सुरू करणार आहे. राजकुमार संतोषी यांनी त्याला अभिनयाच्या दुनियेत लाँच करण्याचे काम हाती घेतले आहे, ज्यांच्या दिग्दर्शनाखाली नमाशी बॅड बॉय या चित्रपटातून पदार्पण करत आहे. या चित्रपटाच्या आश्वासक टीझरनंतर, ट्रेलरची उत्सुकता सगळ्यांना होती. चित्रपटाच्या ट्रेलरच्या आधी, नमाशी चक्रवर्ती आधीच चर्चेत आहे आणि एक अभिनेता आहे ज्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. नमाशीच्या बॅड बॉयचा ट्रेलर शेवटी आला आहे. 

नमाशीने सोशल मीडियावर बॅड बॉयचा ट्रेलर आल्याचे सांगितले. ट्रेलरच्या सुरुवातीलाच नमाशीची रोमँटिक एंट्री आहे आणि जसजसा ट्रेलर पुढे जातो तसतसे आपल्याला नमाशी त्याच्या अभिनयाच्या वेगळ्या छटा पहायला मिळतात. बॅड बॉयच्या ट्रेलरमध्ये नमाशी खऱ्या अर्थाने ‘रॉकिंग बॉय’ आहे. त्याने अपेक्षेपेक्षा चांगला अभिनय केला आहे. ट्रेलर कॉमेडी, अॅक्शन आणि रोमान्सच्या यांचा मेळ असलेला रोम-कॉम चित्रपट आहे.

नमाशी चक्रवर्ती आणि अमरीन यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात जॉनी लीव्हर, सास्वता चॅटर्जी, राजपाल यादव, राजेश शर्मा आणि दर्शन जरीवाला यांच्याही भूमिका आहेत. इनबॉक्स पिक्चर्स, बॅनरखाली अंजुम कुरेशी आणि साजिद कुरेशी निर्मित 'बॅड बॉय'. राजकुमार संतोषी यांनी दिग्दर्शित केला आहे. बॅड बॉय २८ एप्रिल २०२३ रोजी रिलीज होणार आहे.

Web Title: Mithun Chakraborty's son entry in Bollywood from 'Bad Boy', the trailer of the film has been released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.