मिथिला पालकरचा ब्लॅक बिकनीतला फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 06:00 IST2021-03-06T06:00:00+5:302021-03-06T06:00:00+5:30

मिथिलाने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar's black bikini photo goes viral on social media | मिथिला पालकरचा ब्लॅक बिकनीतला फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

मिथिला पालकरचा ब्लॅक बिकनीतला फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

अभिनेत्री मिथिला पालकर हिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.  नुकतीच ती रेणूका शहाणेच्या त्रिभंगा या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक करण्यात आले होते. मिथिलाने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. त्यातील बिकनीतील तिच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

मिथिला पालकर सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. नुकतीच ती अलिबागला व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. तिने तिथले फोटो शेअर केले आहेत. त्यातील तिच्या ब्लॅक बिकनीतील फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

'गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे.

कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्याने घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथिलाने दाखवून दिली आहे.

इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून मितालीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटाद्वारे तिने रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये देखील झळकली होती.

Web Title: Mithila Palkar's black bikini photo goes viral on social media