अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मराठमोळ्या मिथिला पालकरची एन्ट्री, खिलाडी कुमारसोबत साकारणार महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 17:08 IST2026-02-20T17:07:31+5:302026-02-20T17:08:03+5:30

‘भूत बंगला’ हा २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. अक्षय कुमारच्या या सिनेमात आता मराठमोळ्या मिथिला पालकरची एन्ट्री झाली आहे. 

mithila palkar to play important role in akshay kumar bhoot bangla movie | अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मराठमोळ्या मिथिला पालकरची एन्ट्री, खिलाडी कुमारसोबत साकारणार महत्त्वाची भूमिका

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'मध्ये मराठमोळ्या मिथिला पालकरची एन्ट्री, खिलाडी कुमारसोबत साकारणार महत्त्वाची भूमिका

‘भूत बंगला’ हा २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॉलिवूडची अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही ‘ओजी’ जोडी  तब्बल १६ वर्षांनंतर दमदार पुनरागमन करत आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या सिनेमाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या खास विनोदशैलीचा आणि खळखळून हसवणाऱ्या जादूचा अनुभव पुन्हा मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. अक्षय कुमारच्या या सिनेमात आता मराठमोळ्या मिथिला पालकरची एन्ट्री झाली आहे. 

मिथिला पालकर ‘भूत बंगला’ सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ती अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. या फ्रेश कास्टिंगमुळे कथेत एक नवा ट्विस्ट आला असून आता चाहत्यांना या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता लागली आहे. याबाबत अक्षय कुमार म्हणाला, “मिथिलाने तिचा प्रवास इंटरनेटपासून सुरू केला आणि आज ती अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. आणि लवकरच ती एका अशा अभिनेत्यासोबत दिसणार आहे ज्याला मी खूप चांगले ओळखतो. ओळखा पाहू कोण? मी स्वतः! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला ‘भूत’ नाही, तर माझ्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.”


चाहत्यांमध्ये ‘भूत बंगला’बद्दल प्रचंड उत्साह आहे. हा चित्रपट केवळ अक्षय आणि प्रियदर्शन यांच्या जोडीचे पुनरागमनच नाही, तर एक परिपूर्ण फॅमिली एंटरटेनर ठरणार आहे. यात भरपूर विनोद, मजेशीर गोंधळ आणि भावनिक क्षणांचा संगम पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना अक्षय कुमारचा जुना अंदाज आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगसह पाहण्याची अपेक्षा आहे, तर प्रियदर्शन यांचा खास देसी टच पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत वामिका गब्बी, परेश रावल, तबू, राजपाल यादव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर आहेत. येत्या १० एप्रिलला ‘भूत बंगला’हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title : अक्षय कुमार की 'भूत बंगला' में मिथिला पालकर, बहन की भूमिका में।

Web Summary : अक्षय कुमार और प्रियदर्शन 16 साल बाद 'भूत बंगला' के लिए साथ आए। मिथिला पालकर अक्षय की बहन के रूप में शामिल हुईं, जिससे कहानी में नया मोड़ आया। फिल्म 10 अप्रैल को रिलीज होगी और इसमें भरपूर मनोरंजन होगा, साथ ही तब्बू और परेश रावल भी हैं।

Web Title : Mithila Palkar joins Akshay Kumar in 'Bhoot Bungla' as sister.

Web Summary : Akshay Kumar and Priyadarshan reunite after 16 years for 'Bhoot Bungla.' Mithila Palkar joins as Akshay's sister, adding a fresh twist. The film promises humor and family entertainment, with a release date of April 10th, also starring Tabu and Paresh Rawal.