अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 12:49 IST2025-06-19T12:49:25+5:302025-06-19T12:49:50+5:30

अभिनेता डिनो मोरियाचा पाय सध्या खोलात आहे. त्याच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आज गुरूवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात तो चौकशीसाठी दाखल झाला.

Mithi River Desilting Scam Actor Dino Morea Appears Before Ed Again On June 19 | अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण?

अभिनेता डिनो मोरिया चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात, काय आहे प्रकरण?

Mithi River Desilting Scam: अभिनेता डिनो मोरिया आज (गुरूवारी) चौकशीसाठी सक्त वसुली संचलनालयाच्या (ईडी) मुंबई कार्यालयात (Dino Morea Appears Before Ed ) हजर झाला. यावेळी त्याचा भाऊ सॅन्टिनोही त्याच्यासोबत होता. मिठी नदीच्या सफाई कामातील ६५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अभिनेत्याची चौकशी सुरू आहे.  यासंदर्भात अभिनेत्याची आधीही चौकशी झाली आहे. 

मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी ईडीने मुंबईत १५ हून अधिक ठिकाणी छापे टाकलेत. त्यात कोचीतील एका ठिकाणांसह डिनो मोरियाच्या वांद्रे येथील निवासस्थानाचाही समावेश आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डिनो मोरियाला अटक होण्याची भीती सतावतेय. हेच कारण आहे की, १८ जून रोजी ईडीने चौकशीसाठी बोलावल्यावरही तो कार्यालयात हजर झाला नव्हता. याआधी देखील ईडीने डिनो मोरियाची चौकशी केली होती. मात्र, काही अधिक माहिती मिळवण्यासाठी त्याला पुन्हा समन्स पाठवण्यात आलं होतं. या चौकशीसाठी आता तो हजर झाला आहे.

काय आहे प्रकरण?

गेल्या दोन दशकांपासून मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. याकरिता कंत्राट देण्यात आले. मात्र, हे काम प्रत्यक्षात झालेच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंबईला महापूराचा धोका होऊ नये, मुंबईत पाणी साचू नये हा यामागील उद्देश होता. पण पुढे तपासात असे पुढे आले की, प्रत्यक्षात कोणतीही नाले, नदी सफाई करण्यात आली नाही. या सफाईसाठी बिल, बनावट अहवाल सादर करण्यात आले. ड्रेजिंग उपकरणे भाड्याने घेताना त्यात अनियमितता करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. या सर्व प्रकरणात कोट्यवधींचा मोठा घोटाळा झाल्याचा कथित आरोप आहे. या प्रकरणी अटक आरोपी केतन कदम आणि मोरिया बंधूंमध्ये अनेक फोन कॉल्स झाल्याचे दिसून आले. हे कॉल कशासाठी होते? याचा तपास सुरू आहे. तसेच या गैरव्यवहारातील रक्कम ज्या कंपन्यांपर्यंत पोहोचली त्याचे धागेदोरे मोरियापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे.

Web Title: Mithi River Desilting Scam Actor Dino Morea Appears Before Ed Again On June 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.