माझ्या नावाचा गैरवापर : अमिताभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 20:48 IST2016-04-06T03:48:40+5:302016-04-05T20:48:40+5:30

संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या पनामा पेपर लिकमुळे भल्याभल्या लोकांची झोप उडाली आहे. संपूर्ण जागतील धनाढ्य लोक कशा प्रकारे टॅक्स ...

Misuse of my name: Amitabh | माझ्या नावाचा गैरवापर : अमिताभ

माझ्या नावाचा गैरवापर : अमिताभ

पूर्ण जगाला हादरा देणाऱ्या पनामा पेपर लिकमुळे भल्याभल्या लोकांची झोप उडाली आहे. संपूर्ण जागतील धनाढ्य लोक कशा प्रकारे टॅक्स चोरी करतात, काळा पैैसा व्हाईट करतात, विदेशात फर्जी कंपन्या स्थपान करून संपत्ती लपविण्यासारख्या अनेक घोटाळ्यांचा महाखुलासा कायदेविषयक सेवा पुरवणाऱ्या ‘मोसॅक फोन्सेका’ या पनामा स्थित कंपनीची 1.12 कोटी गोपनीय कागदपत्रे शोधपत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने उघड केल्यामुळे समोर आला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादमिर पुतीनसारख्या जागतिक नेत्यांपासून अनेक कलावंत, खेळाडू, जागतिक गुन्हेगारांची नावे यामध्ये सामाविष्ट आहेत. परंतु सर्वात खळबळजनक नाव होते ते बॉलिवूडचे महानाय अमिताभ बच्चन आणि त्यांची सून व अभिनेत्री ऐश्वर्या राय यांचे.

बच्चन यांनी विदेशात बनावट कंपन्या स्थापन करून देशाचा कर बुडविल्याचे आरोप त्याच्यावर करण्यात येत आहेत. अभिताभ यांनी सर्व आरोपांचे खंडन करत आपल्या नावाचा गैरवापर करण्यात येत असल्याचे सांगितले.

ते म्हणाले, पनामा पेपर प्रकरणात माझ्या नावाचा दुरपयोग करण्यात येत असल्याची शक्यता आहे. मी नेहमी सर्व कर भरले असून विदेशात खर्च केलेल्या पैशावरही मी कर दिला आहे. त्यामुळे अशा प्रकारे कर चुकवेगिरीचा माझ्यावर करण्यात येत असलेले आरोप मी फेटाळून लावतो.

Web Title: Misuse of my name: Amitabh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.