मिस युनिव्हर्स हरनाज संधू या आजाराचा करतेय सामना, वाढलेल्या वजनावर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 18:57 IST2022-04-01T16:19:31+5:302022-04-01T18:57:26+5:30
मिस युनिव्हर्स हरनाज संधूला वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं होतं. यावर तिने ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलंय.

मिस युनिव्हर्स हरनाज संधू या आजाराचा करतेय सामना, वाढलेल्या वजनावर ट्रोल करणाऱ्यांना दिले प्रत्युत्तर
मिस युनिव्हर्सहरनाज संधू सध्या भारतात असून अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे. अलीकडेच हरनाजने एका फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला होता ज्यामध्ये तिचे वजन वाढल्याचे दिसून आले होते. हरनाजने त्याच्या सोशल मीडिया पेजवर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केल्यानंतर तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. अवघ्या 3 महिन्यांत हरनाजचे वजन वाढले. त्याचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क झाले. वाढलेल्या वजनाबाबत हरनाजने खुलासा केला आहे.
हरनाझ celiac नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. हे अन्नामध्ये असलेल्या ग्लूटेनच्या प्रतिक्रियेमुळे होते. शाळेच्या दिवसांमध्ये तिला खूप बारीक होती म्हणून तिला चिडवलं जायचं आणि आता तिच्या वाढलेल्या वजनामुळे तिला ट्रोल केले जात आहे. हरनाझ म्हणाली, 'मी अशा लोकांपैकी जीला तू खूप बारीक आहे आणि आता तू खूपड जाड आहेस म्हणून बोललं जातंय. माझ्या आजाराबद्दल कोणालाही माहिती नाही. याच कारणामुळे मी गव्हाचे पीठ आणि इतर अनेक गोष्टी खाऊ शकत नाही.
हरनाज पुढे म्हणाली की, जेव्हा ती वेगवेगळ्या शहरांमध्ये राहते तेव्हा शरीरात अनेक बदल होतात. ती म्हणाली, मी पहिल्यांदा न्यूयॉर्कला गेलो होतो, ते माझ्यासाठी पूर्णपणे वेगळं जग होतं. मी शरीराच्या सकारात्मकतेवर विश्वास ठेवणारी आहे.
“एकीकडे, मिस युनिव्हर्स प्लॅटफॉर्मवर, आम्ही महिला सक्षमीकरण आणि शरीर सकारात्मकतेबद्दल बोलतो आणि जर मी यातून जाते आहे… मला माहिती आहे की बरेच लोक मला ट्रोल करत आहेत आणि ते ठीक आहे कारण त्यांची मानसिकता ही आहे. मग ती मिस युनिव्हर्स असो वा नसो, असे अनेक लोक दररोज ट्रोल होतात.