माजी ‘मिस इंडिया अर्थ’ तन्वी व्यास लग्नाच्या बेडीत! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 11:09 IST2018-12-14T11:08:33+5:302018-12-14T11:09:48+5:30

दीपिका-रणवीर, प्रियांका- निक, ईशा-आनंद, कपिल-गिन्नी यांच्यापाठोपाठ ‘मिस इंडिया अर्थ’चा किताब जिंकणारी तन्वी व्यास ही सुद्धा लग्नबंधनात अडकली.

miss india tanvi vyas ties the knot with actor harsh nagar | माजी ‘मिस इंडिया अर्थ’ तन्वी व्यास लग्नाच्या बेडीत! पाहा, फोटो!!

माजी ‘मिस इंडिया अर्थ’ तन्वी व्यास लग्नाच्या बेडीत! पाहा, फोटो!!

ठळक मुद्देतन्वीने २००८ मध्ये फेमिना मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. याशिवाय तामिळ चित्रपटात तिने काम केले आहे. यानंतर  ‘अ स्कँडल’ या बॉलिवूड चित्रपटात ती झळकली.

दीपिका-रणवीर, प्रियांका- निक, ईशा-आनंद, कपिल-गिन्नी यांच्यापाठोपाठ ‘मिस इंडिया अर्थ’चा किताब जिंकणारी तन्वी व्यास ही सुद्धा लग्नबंधनात अडकली. तन्वीने अभिनेता हर्ष नागरसोबत लग्नगाठ बांधली.  गुजरातच्या बडोद्यात हा लग्नसोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नानंतर तन्वी व हर्ष यांच्या लग्नाची दोन रिसेप्शन्स होणार आहे. पहिले रिसेप्शन दिल्लीत आयोजित केले गेले आहे. तर दुसरे मुंबईत.

२००९ मध्ये मुंबईच्या एका अ‍ॅक्टिंग कोर्सदरम्यान तन्वी व हर्ष पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. याचदरम्यान दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम. आता हे प्रेम पती-पत्नीच्या नात्यात बदलले आहे. हर्षने २०११ मध्ये शाहरूख खानचे प्रॉडक्शन हाऊस ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ निर्मित ‘आॅलवेज कभी कभी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. पाठोपाठ ‘कर ले तू भी मोहब्बत’ या वेबसीरिजमध्ये झळकला. ही वेबसीरिज कमालीची गाजली होती.


तन्वीने २००८ मध्ये फेमिना मिस इंडिया अर्थचा किताब जिंकला होता. याशिवाय तामिळ चित्रपटात तिने काम केले आहे. यानंतर  ‘अ स्कँडल’ या बॉलिवूड चित्रपटात ती झळकली.

Web Title: miss india tanvi vyas ties the knot with actor harsh nagar