Mirzapur च्या मुन्ना भैय्याच्या फॅन्ससाठी खास बातमी, लवकरच करणार मोठा धमाका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 15:37 IST2022-02-25T15:33:22+5:302022-02-25T15:37:57+5:30
Divyenndu Sharma : दिव्येंदु शर्माने सिनेमाच्या शूटींग दरम्यान त्याच्या कठिण रात्रीबाबत खुलासा केला. जो भोपाल गॅस दुर्घटनेवर आधारित आहे.

Mirzapur च्या मुन्ना भैय्याच्या फॅन्ससाठी खास बातमी, लवकरच करणार मोठा धमाका!
'मिर्झापूर 3' ची आतुरतेने वाट बघणाऱ्या लोकांसाठी मुन्ना भैया एक सरप्राइज घेऊन आले आहेत. मुन्ना भैया म्हणजे दिव्येंदु शर्मा (Divyenndu Sharma) ने यशराज फिल्मची पहिली वेब सीरीज 'द रेल्वे मॅन' (The Railway Men) मध्ये दिसणार आहे. या सीरीजमध्ये दिव्येंदु पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसणार आहे.
दिव्येंदु शर्माने सिनेमाच्या शूटींग दरम्यान त्याच्या कठिण रात्रीबाबत खुलासा केला. जो भोपाल गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. एका अंदाजानुसार, या दुर्घटनेत १५ हजारांपेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले होते. आणि ६ लाखांपेक्षा जास्त मजूर प्रभावित झाले होते.
आपल्या कठिण शूटींग शेड्यूलबाबत बोलताना दिव्येंदु म्हणाला की, मी जास्तीत जास्त रात्रीचं शूटींग करत आहे. कारण हा शो भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. मी मागच्या महिन्यात पूर्ण रात्री शूटींग केलं. मी हे ठामपणे म्हणून शकतो की हे माझ्या जीवनातलं आतापर्यंतचं सर्वात कठिण शूट होतं.
दिव्येंदु याआधी 'प्यार का पंचनामा', 'टॉयलेट एक प्रेम कथा', 'बत्ती गुल मीटर चालू' आणि प्राइम व्हिडीओ वेब सीरीज 'मिजार्पुर' मध्ये दिसला होता. मिर्झापूरमधून त्याला खूप जास्त लोकप्रियता मिळाली.
आता या नव्या सीरीजमध्ये दिव्येंदू शर्मासोबतच आर. माधवन, के के मेनन आणि बाबिल शाहसारखे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान दिव्येंदुचा 'मेरी देश की धरती' हा सिनेमाही लवकरत रिलीज होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, तो इम्तियाज अलीच्या प्रोजेक्टचा भागही होणार आहे.