​पापाराझींवर बरसली मीरा राजपूत! कारण ठरली मीशा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 13:12 IST2018-01-05T07:42:21+5:302018-01-05T13:12:21+5:30

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि त्यांची तान्हुली मीशा कपूर या दोघी मायलेकीचे फोटो सोशल मीडियावर अधून ...

Mirpur Rajput rainy days! It was because of Micah !! | ​पापाराझींवर बरसली मीरा राजपूत! कारण ठरली मीशा!!

​पापाराझींवर बरसली मीरा राजपूत! कारण ठरली मीशा!!

लिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि त्यांची तान्हुली मीशा कपूर या दोघी मायलेकीचे फोटो सोशल मीडियावर अधून मधून दिसतात. पण कदाचित मीराला आताश: हे फोटो खटकू लागले आहेत. होय, मीराचा संयम संपत असल्याचे दिसतेय. अर्थात त्याला कारणही तसेच आहे. 
अलीकडे मीरा आपल्या मुलीला खेळवायला एका पार्कमधील प्ले ग्राऊंडवर घेऊन गेली होती. पण पापाराझींनी येथेही मीरा व मीशाचा पिच्छा पुरवला. मीशाचे प्ले ग्राऊंडमधील फोटो क्लिक करण्यासाठी पापाराझींनी जीवाचे रान केले. हे फोटो लगेच सोशल मीडियावर व्हायरलही झालेत.



या फोटोंमध्ये मीशा अतिशय आनंदात  राईड्स एन्जॉय करताना दिसतेय. मीराच्या काही मैत्रिणीही आपआपल्या मुलांसोबत याठिकाणी आहेत. मीशाचे मैदानात खेळतानाचे हे फोटो अनेकांना आवडले. पण मीशाच्या मम्माचा राग मात्र हे फोटोपाहून अनावर झाला. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेच मीराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून याबद्दलची नाराजी बोलून दाखवली. ‘मित्रांनो, प्लीज थोडी दया दाखवा. मुलांना त्यांचे लहानपण उपभोगू द्या आणि त्यांच्या फोटोंची जबाबदारी त्यांच्या माता-पित्यांवर सोडा,’ असे मीराने लिहिले.



ALSO READ : मम्माचे बोट धरून कुठे निघाली शाहिद कपूरची लाडकी लेक मीशा? 

अलीकडे एका मुलाखतीत मीरा मीशाला मिळत असलेल्या मीडिया अटेंशनवर बोलली होती. हे तर होतच राहणार. म्हणून मी मीशाला कायम बंद दरवाज्याआड ठेवू शकत नाही. मी तिला सामान्य मुलांसारखे वाढवू इच्छिते, असे मीरा म्हणाली होती.मीराला आधी लेकीचे फोटो व्हायरल झालेले आवडायचे नाही. पण हळूहळू तिनेही ते मान्य केले. आधी मीशाचे फोटो क्लिक होताना पाहून मी अस्वस्थ व्हायचे. पण आता मला सवय झाली आहे. हा आमच्या आयुष्याचा भाग आहे, असे मीरा अलीकडे म्हणाली होती. पण कदाचित असे म्हणणे वेगळे आणि तसे वागणे वेगळे.
शाहिदने ७ जुलै २०१५ रोजी मीरा राजपूतसोबत लग्न केले होते. यानंतर २६ आॅगस्ट २०१६ रोजी मीशाचा जन्म झाला.  

Web Title: Mirpur Rajput rainy days! It was because of Micah !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.