"मी दारु पित नाही, त्यामुळे.."; शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला असं का म्हणावं लागलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 10:42 IST2025-05-23T10:41:19+5:302025-05-23T10:42:40+5:30
शाहिद कपूरच्या बायकोने दारु पित नाही असं सर्वांना सांगितलं. का म्हणाली?

"मी दारु पित नाही, त्यामुळे.."; शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतला असं का म्हणावं लागलं?
शाहिद कपूरची बायको मीरा राजपूत (mira rajput) तिच्या बेधडक आणि बिनधास्त वक्तव्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. शाहिदच्या करिअरच्या चढ-उतारात पत्नी म्हणून मीराने शाहिदला खंबीर साथ दिली आहे. नुकतंच फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मीराने ती शुद्ध शाकाहारी असून दारु पित नाही, अशी कबूली दिली आहे. मीराला असं का जाहीरपणे का सांगावं लागलं? जाणून घ्या सविस्तर
मीराने काय म्हणाली
फोर्ब्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीत मीरा म्हणाली की, "मी जेवणाच्या बाबतीत खूप सावधानता बाळगते. याशिवाय अंड वगैरे मी खात नाही. मी शुद्ध शाकाहारी जेवण खाते. एकदा एक व्यक्ती माझ्याकडे व्यावसायिक दृष्टीकोनातून भेटायला आला होता. त्या व्यक्तीला रेस्टॉरंट उघडायचं होतं. मी दारु पित नाही, शाकाहारी आहे त्यामुळे अशा व्यवसायात मला सहभागी व्हायचं नव्हतं. मला माझ्या तत्वांपलीकडे जायचं नव्हतं. यासाठी मी कुठलीच तडजोड करु शकत नाही."
"एक पब्लिक फिगर होण्याच्या नात्याने अनेकदा मला अशा गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु अशावेळी तुम्ही तुमच्या मनाचं ऐकणं जास्त महत्वाचं आहे. दुसरी माणसं काय बोलत आहेत त्याने प्रभावित होण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐकणं मला गरजेचं वाटतं.", अशाप्रकारे मीरा राजपूतने खुलासा केला. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत ही युट्यूबर असून ती विविध ब्रँड्स आणि प्रॉडक्ट्सच्या जाहिराती करताना दिसते. मीरा आणि शाहिदची जोडी सर्वांची लाडकी जोडी आहे.