चिमुकल्या निशाने इंग्रजीतील ‘हा’ शब्द उच्चारताच हरकूून गेली मम्मी सनी लिओनी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 20:09 IST2017-07-26T14:39:54+5:302017-07-26T20:09:54+5:30

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर आई-वडील बनले आहेत. या दाम्पत्याने लातूर येथील एक मुलगी ...

Mimi Sunny Leone went on talking with the word 'Hai' in English. | चिमुकल्या निशाने इंग्रजीतील ‘हा’ शब्द उच्चारताच हरकूून गेली मम्मी सनी लिओनी!!

चिमुकल्या निशाने इंग्रजीतील ‘हा’ शब्द उच्चारताच हरकूून गेली मम्मी सनी लिओनी!!

ही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर आई-वडील बनले आहेत. या दाम्पत्याने लातूर येथील एक मुलगी दत्तक घेतली आहे. सनीने याबाबतचा खुलासा करताच सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा रंगत आहे. सनी आणि डेनियलचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. खरं तर सनीने अचानक मुलीला दत्तक घेऊन अनेकांना चकित केले आहे. त्यामुळेच सध्या सर्वत्र सनीच्या मुलीची चर्चा रंगत आहे. सनीचे चाहते या मुलीविषयी जाणून घेण्यास प्रचंड उत्सुक आहेत. ही मुलगी कोण?, तिचे नाव काय? ती कुठे राहत होती? असे असंख्य प्रश्न सनीच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. 

आता या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आमच्या व्ह्यूवरकरिता घेऊन आलो आहोत. सनी आणि पती डेनियलने दत्तक घेतलेल्या मुलीचे नाव निशा कौर वेबर असे आहे. ही मुलगी लातूर येथील रहिवासी असून, ती केवळ २१ महिन्यांची आहे. निशा सनी आणि डेनियलची लाडकी आहे. दोघेही तिच्यावर प्रचंड प्रेम करतात. परंतु यासाठी त्यांना काही गोष्टी जुळवून घेताना अनेक अडचणींचा सामनाही करावा लागत आहे. निशासोबत बोलणे सनी आणि डेनियलला एखादा संघर्ष केल्याप्रमाणे आहे. कारण या चिमुकल्या परीला सनी आणि डेनियलसारखे फर्राटेदार इंग्रजी अजिबातच बोलता येत नाही. 



मात्र निशा आपल्या मम्मी-पप्पाप्रमाणे इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करीत आहे. काही दिवस सनी आणि डेनियलबरोबर वेळ व्यतीत केल्याने निशा आता बाय-बाय म्हणायला लागली आहे. सनीने दत्तक घेतलेल्या निशाचे आतापर्यंतचे आयुष्य ग्रामीण भागात गेले आहे. त्यामुळे ती सर्वसामान्य मुलीप्रमाणेच बोलत असल्याने तिला इंग्रजीत बोलताना बºयाच अडचणी येत आहेत; मात्र हळूहळू ती या सगळ्या गोष्टी शिकणार असून, तिच्या लाइफस्टाइलमध्ये बराच बदल होईल यात शंका नाही. 

दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच सनी आणि डेनियलने भारत सरकार आणि सीएआरए यांच्याकडे मुलगी दत्तक घेण्यासाठी अप्लाय केले होते; मात्र पेपर वर्क करण्यामध्ये बराचसा वेळ गेल्याने, ही चिमुकली आता सनीच्या मिठीत आली आहे. जेव्हा सनी आणि डेनियलने निशाला लातूर येथून मुंबईला आणले तेव्हा या आठ तासांच्या प्रवासात निशा केवळ हसत आणि खेळत होती. ज्याप्रमाणे सनी आणि डेनियलच्या आयुष्यात निशा आल्याने ते आनंदी झाले, अगदी त्याचप्रमाणे निशादेखील मम्मी-पप्पा मिळाल्याने खूश आहे. 

Web Title: Mimi Sunny Leone went on talking with the word 'Hai' in English.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.