अभिनेत्याचा मुसळधार पावसात सायकलवरून मुंबई ते गोवा प्रवास, ५९व्या वर्षीही असा फिटनेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 14:29 IST2025-07-01T14:28:50+5:302025-07-01T14:29:13+5:30

डोंगर, घाट, सायकलिंग आणि रनिंग! ५९ वर्षांचे मिलिंद सोमण अजूनही अफाट तंदुरुस्त

Milind Soman Mumbai To Goa Cycling Concludes 5th Fit Indian Run With Wife Ankita Konwar | अभिनेत्याचा मुसळधार पावसात सायकलवरून मुंबई ते गोवा प्रवास, ५९व्या वर्षीही असा फिटनेस!

अभिनेत्याचा मुसळधार पावसात सायकलवरून मुंबई ते गोवा प्रवास, ५९व्या वर्षीही असा फिटनेस!

Milind Soman Mumbai To Goa Cycling: अभिनेते मिलिंद सोमण त्यांच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो. मिलिंद यांच्या अप्रतिम फिटनेसची झलक त्यांच्या चित्रपटांमधून चाहत्यांना पाहायला मिळते.  मिलिंद सोमण यांचा एक मोठा चाहतावर्ग आहे. ते चाहत्यांसाठी नेहमी सोशल मीडियावर फिटनेससंदर्भातील विविध व्हिडीओ शेअर करत असतो. दरम्यान, मिलिंद यांनी अलीकडेच इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडीओने सर्वांना चकीत केले आहे. या व्हिडीओमध्ये तो अशी गोष्ट करताना दिसत आहेत, ज्याचा कुणी विचारही करणार नाही.

मिलिंद सोमण पुन्हा एकदा चर्चेत आलेत. यावेळी कारणही तसंच भन्नाट आहे. मिलिंद सोमण यावेळी सायकलवरून थेट मुंबईहून गोव्यापर्यंतचा प्रवास केलाय. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसातही त्यांची ही अ‍ॅडव्हेंचर ट्रिप थांबली नाही. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट्स आणि व्हिडीओमधून त्यांच्या या प्रवासाची झलक पाहायला मिळते आहे. विशेष म्हणजे त्याच्या या अ‍ॅडव्हेंचरमध्ये त्यांची पत्नी अंकितानेही त्यांच्यासोबत प्रवास केलाय. फिट इंडिया रनचा भाग म्हणून त्यांनी हे आव्हान पूर्ण केल्याची माहिती आहे.


मिलिंद यांनं इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात कॅप्शमध्ये त्यांनी लिहलं, "दुसरा आणि तिसरा दिवस, फक्त डोंगरच डोंगर... घाटावर घाट, घाटावर घाट… असा होता. सलग तीन दिवस ९० किमी सायकलिंग आणि २० किमी धावणे असा अनुभव होता. शरीर दमलं असलं तरी मन खूप छान वाटतंय. सेल्फीसाठी पुषअप्सही भरपूर केले आणि प्रवासात अनेक तंदुरुस्त भारतीयांची भेट झाली. लोक नेहमी विचारतात  "कशाला करतोस इतकं? शेवटी मरणंच आहे ना!" पण मला वाटतं, जर मी प्रत्येक वयात मन आणि शरीराच्या क्षमतेच्या मर्यादा शोधल्या नाहीत, तर मी खऱ्या अर्थाने जगलोच नाही किंवा देवाने दिलेल्या अद्भुत देणग्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही", असं त्यांनी म्हटलं. 

Web Title: Milind Soman Mumbai To Goa Cycling Concludes 5th Fit Indian Run With Wife Ankita Konwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.