पाच वर्षांपूर्वी नाईट क्लबच्या डान्स फ्लोरवर झाली होती अंकिता- मिलिंदची नजरानजर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 18:28 IST2018-08-01T18:27:08+5:302018-08-01T18:28:02+5:30
होय, मिलिंद व अंकितागेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, हे स्पष्ट झाले आहे.

पाच वर्षांपूर्वी नाईट क्लबच्या डान्स फ्लोरवर झाली होती अंकिता- मिलिंदची नजरानजर!
५२ वर्षांचा अभिनेता मिलिंद सोमण याने गत एप्रिल लहान गर्लफ्रेन्ड अंकिता कंवरसोबत लग्न केले. अलीबाग येथे दोघेही लग्नबंधनात अडकले. मिलिंद व अंकिता यांचे लग्न सर्वांसाठीच आश्चर्याचा धक्का होता. याचे कारण म्हणजे, दोघांमधील वयाचे अंतर. अंकिताने तिच्यापेक्षा २५ वर्षांनी मोठ्या मिलिंदसोबत लग्नगाठ बांधावी, याचेच अनेकांना आश्चर्य वाटले होते. पण म्हणतात ना, प्रेमात कोणतीच गोष्ट आड येत नाही. अंकिता व मिलिंद दोघांनीही हेच सिद्ध करून दाखवल. ही प्रेमकहाणी नव्याने सांगण्याचे कारण म्हणजे, अंकिताने शेअर केलेला एक नवा व्हिडिओ. होय, मिलिंद व ती गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, हे या व्हिडिओमुळे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओत अंकिता व मिलिंद एका नाईट क्लबमध्ये डान्स करताना दिसताहेत. पाच वर्षांपूर्वी याच नाईट क्लबच्या डान्स फ्लोरवर मिलिंद व अंकिता यांची नजरानजर झाली होती. ‘आमची भेट एका नाईट क्लबमध्ये झाली होती. आजूबाजूला लाऊड म्युझिक आणि क्रेझी क्राऊड असे सगळे असताना आमची नजरानजर झाली. त्या एका क्षणाने जादू केली होती. आजही ती कायम आहे,’ असे तिने लिहिले आहे.
आठवडाभरापूर्वी मिलिंद व अंकिताने स्पेनमध्ये पुन्हा एकदा लग्न केले. होय, अंकिताचे म्हणे जंगलात वाहणाऱ्या धबधब्याच्या साक्षीने लग्न करण्याचे स्वप्न होते. मिलिंदने अंकिताचे हे स्वप्नही पूर्ण केले. यानंतर तर मिलिंद व अंकिता आणखीच चर्चेत आले. . मिलिंद व अंकिताची हीच लोकप्रीयता लक्षात घेऊन या कपलला ‘बिग बॉस12’ची आॅफर मिळाली असल्याचे कळतेय. मेकर्सने या दोघांशीही या शोसंदर्भात संपर्क साधल्याची ताजी बातमी आहे. अर्थात मिलिंद व अंकिताने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.