'मेड फॉर इच अदर' कपल मिलिंद सोमनने पत्नी अंकितासह अशी सेलिब्रेट केली लग्नाची दुसरी अॅनिव्हर्सरी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:14 IST2020-04-24T17:14:00+5:302020-04-24T17:14:35+5:30
२००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. या दोघांचे ब्रेकअफ झाले त्यानंतर मिलिंद अंकिताच्या प्रेमात पडला. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे.

'मेड फॉर इच अदर' कपल मिलिंद सोमनने पत्नी अंकितासह अशी सेलिब्रेट केली लग्नाची दुसरी अॅनिव्हर्सरी !
मिलिंद लग्न करणार हाच अनेकांसाठी मोठा धक्का होता. कारण मिलिंद हा ५२ वर्षाचा तर अंकिताचे वय २७ वर्षे होते. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले. अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला होता. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.
दीड वर्ष मिलिंद अंकिताला डेट करत होता. अखेर दोघांनाही एकमेकांच्या आवडी-निवडी समजल्यानंतर त्यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. आज हे कपल लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. लॉकडाऊनमुळे घरातच हे दोघे सेलिब्रेशन करत आहेत. आम्ही हा दिवस समुद्राच्या मध्यभागी कुठेतरी फ्रुटी ड्रिंक्स पिऊन घालवणार होतो. पण हेदेखील काही वाईट नाही. घरातील जेवण आणि कोकम शरबत पिणेही विलक्षण आहे. थोडक्यात, सांगायचे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट तुझ्यासोबत सुंदर आहे." असे म्हणत अंकिताने मिलिंदला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या दोघांनी तिस-या वर्षात पदार्पण केले 300 मजले चढण्यासाठी जेव्हा मिलिंदने अंकिताला विचारले, तेव्हा तिने लगेचच हो म्हटले."
२००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. या दोघांचे ब्रेकअफ झाले त्यानंतर मिलिंद अंकिताच्या प्रेमात पडला. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. 22 एप्रिल 2018 रोजी लग्न करत आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.