मायकल जॅक्सनच्या अंदाजातला टायगर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2016 13:36 IST2016-10-03T06:37:22+5:302016-10-03T13:36:28+5:30
अॅक्शन आणि डान्स या जोरावर अतिशय कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. ...

मायकल जॅक्सनच्या अंदाजातला टायगर!!
अ ॅक्शन आणि डान्स या जोरावर अतिशय कमी वेळात बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ. लवकरच टायगरचा ‘मुन्ना मायकल’ हा सिनेमा येतोय. या सिनेमातील टायगरचा फर्स्ट लूक आज आऊट झाला. खुद्द टायगरने मायकल जॅक्शनच्या अंदाजातील हा लूक चाहत्यांशी शेअर केला आहे. याद्वारे टायगरने मायकल जॅक्शनला अभिवादन केले आहे. ‘या प्रवासाचा क्षण अन् क्षण एन्जॉय करतोय. हे ख-या अर्थाने कठीण आहे. हा चित्रपट एका खास व्यक्तिला समर्पित आहे,’अशा भावना टायगरने व्यक्त केल्या आहेत. शब्बीर खान दिग्दर्शित या चित्रपटात टायगरसोबत निधी अग्रवाल दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे निधी बॉलिवूडमध्ये डेब्यू करते आहे. शब्बीरसोबतचा टायगरचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी ‘हिरोपंती’ आणि ‘बागी’मध्ये टायगर व शब्बीरने सोबत काम केलेय.