‘मायकेल जॅक्सनप्रमाणे माझेही नाव असावे प्रत्येकाच्या ओठी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2016 17:59 IST2016-12-22T17:59:06+5:302016-12-22T17:59:06+5:30

‘यंग अ‍ॅण्ड डॅशिंग’ टायगर श्रॉफ हा ‘डान्सिंग स्टार’ हृतिक रोशनला स्वत:चा गुरू मानतो. हृतिकनेही त्याच्या डान्सिंगचे अनेकदा कौतुक केले ...

'Like Michael Jackson, my name should be' Everybody's lips' | ‘मायकेल जॅक्सनप्रमाणे माझेही नाव असावे प्रत्येकाच्या ओठी’

‘मायकेल जॅक्सनप्रमाणे माझेही नाव असावे प्रत्येकाच्या ओठी’

ंग अ‍ॅण्ड डॅशिंग’ टायगर श्रॉफ हा ‘डान्सिंग स्टार’ हृतिक रोशनला स्वत:चा गुरू मानतो. हृतिकनेही त्याच्या डान्सिंगचे अनेकदा कौतुक केले आहे. अलीकडेच रिलीज झालेल्या ‘बागी’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर मिळालेले यश त्याने एन्जॉय केले. मात्र, सुपरहिरो चित्रपट ‘अ फ्लार्इंग जट’ ला मिळालेले अपयश तो अद्याप पचवू शकलेला  नाही. त्याला असे वाटते की, ‘किंग आॅफ डान्स’ मायकेल जॅक्सन प्रमाणे माझेही नाव प्रत्येक व्यक्तीच्या ओठी असावे.’

नुकतेच एका मुलाखतीदरम्यान बोलताना तो म्हणाला, ‘अ फ्लार्इंग जट ला बॉक्स आॅफिसवर मिळालेल्या अपयशानंतर मी फार खचून गेलो होतो. लहान मुले हा माझा मुख्य प्रेक्षक वर्ग होता. पण, बॉक्स आॅफिस कुठल्या चित्रपटाला कसा रिस्पॉन्स देईल? याविषयी कुठलाच अंदाज वर्तवता येत नाही. मी ‘एएफजे’ मुळे मला झालेल्या ताणतणावातून बाहेर आलो आहे. मला आता ‘एबीसीडी’ च्या एखाद्या सिक्वेलमध्ये डान्स डायरेक्टर रेमोसोबत काम करायला नक्कीच आवडेल.’ 

टायगर श्रॉफ हा त्याचा आगामी ‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटाची शूटिंग करतो आहे. चित्रपटाचे कथानक डान्सवर आधारित असून त्याच्यासोबत सहकलाकाराच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा असेल. डान्सिंग स्टार होण्यासाठी धडपडणाऱ्या  मुन्नाची ही कथा असून त्याला मायकेल जॅक्सनप्रमाणे डान्स करता यावा असे वाटत असते. मायकेल जॅक्सनसारखं नाव माझंही व्हावं असं त्याचं स्वप्न असतं. 

Web Title: 'Like Michael Jackson, my name should be' Everybody's lips'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.