#Metoo : अमृता पुरीने म्हटले असे काय म्हटले की, फरहान अख्तरच्या नाकाला झोंबल्या मिरच्या?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 10:30 IST2018-10-14T10:29:27+5:302018-10-14T10:30:41+5:30

मीटू मोहिमेअंतर्गत साजिद खानवर झालेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. याचदरम्यान अभिनेत्री अमृता पुरी हिने ट्विट करून आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

#Metoo : amrita puri called sajid khan a creep here is how farhan akhtar reacted to her tweet | #Metoo : अमृता पुरीने म्हटले असे काय म्हटले की, फरहान अख्तरच्या नाकाला झोंबल्या मिरच्या?

#Metoo : अमृता पुरीने म्हटले असे काय म्हटले की, फरहान अख्तरच्या नाकाला झोंबल्या मिरच्या?

मीटू मोहिमेअंतर्गत साजिद खानवर झालेल्या गैरवर्तनाच्या आरोपांनी खळबळ माजली आहे. एकापाठोपाठ एक अनेक महिलांनी साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. याच आरोपांमुळे साजिदला ‘हाऊसफुल 4’मधून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. साजिदची बहीण फराह खान आणि चुलत भाऊ फरहान अख्तर यांनीही साजिदने चूक केली असेल तर त्याला त्याचे परिणाम भोगावेच लागतील, असे म्हटले आहे. याचदरम्यान अभिनेत्री अमृता पुरी हिने ट्विट करून आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.



‘साजिद खान महिलांसोबत कसा वागतो, हे प्रत्येकालाचं ठाऊक आहे. साजिदसोबत गाठ पडलीचं तर सावध राहा, असे मलाही अनेकांनी बजावले होते. साजिदवर जे काही आरोप ठेवले जात आहेत, ते त्याच्या कुटुंबासाठी धक्कादायक आहेत, हे ऐकून मला आश्चर्य वाटतेय. त्याच्या कुटुंबाला हे आधीच माहित असायला हवे होते,’असे ट्विट अमृृता पुरीने केले आहे.
साजिदने वा फराह खानने अमृता पुरीच्या या ट्विटला उत्तर दिलेले नाही. पण साजिदचा चुलत भाऊ फरहान अख्तर हा मात्र अमृताचे हे ट्विट वाचून चांगलाच भडकला. मग काय फरहान लगेच अमृतावर तुटून पडला. ‘तुझा राग मी समजू शकतो. पण आम्हाला साजिदबद्दल सगळे ठाऊक असूनही आम्ही शांत राहिलो, हा तुझा आरोप मात्र मला मान्य नाही. आमच्यासाठी साजिदवरचे आरोप खरोखरंच धक्कादायक आहेत, ’असे फरहानने अमृताला सुनावले.

 यानंतर अमृता व फरहान यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपली. फरहानचे हे ट्विट बघून अमृताही सणकली. ‘माझे ट्विट थेट तुझ्याबद्दल नव्हते़ मग तुला ते इतके का लागले? माझ्या ट्विटचा अशा पद्धतीने अर्थ लावणे मुळीच योग्य नाही. मी चूक असेल तर माफी. पण साजिदच्या कृत्यांबद्दल सगळेच जाणतात. असे असूनही यामुळे अनेकांना धक्का बसतो, हे मात्र मी पचवू शकले नाही,’असे यावर अमृता पुरी म्हणाली.
आता अमृता पुरी व फरहान अख्तर यांच्यापैकी कोण खरं बोलतय, ते लवकरच कळेल.

Web Title: #Metoo : amrita puri called sajid khan a creep here is how farhan akhtar reacted to her tweet