दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:46 IST2025-05-06T11:45:06+5:302025-05-06T11:46:00+5:30

शकिराही दिलजीतसोबत व्हिडिओ शेअर करत म्हणाली, HI India!

met gala 2025 pop queen shakira shared video with punjabi singer diljit dosanjh | दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले

दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले

सर्वांचा लाडका गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) त्याच्या साधेपणाने सर्वांचंच मन जिंकतो. दिलजीतच्या कॉन्सर्ट्स तर हाऊसफुल असतात. जगभरात त्याचे करोडो चाहते आहेत. शिवाय सिनेमांमध्येही त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले आहे. यावर्षी दिलजीतने थेट Met Gala मध्ये पदार्पण केले. व्हाईट रंगाच्या आऊटफिटमध्ये तो महाराजासारखाच दिसत होता. मेट गालामधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यामध्ये तो चक्क हॉलिवूड गायिका शकिरासोबत (Shakira) एकाच व्हॅनिटीमध्ये दिसत आहे.

दिलजीत दोसांझनेमेट गाला २०२५ मध्ये पदार्पण केलं. न्यूयॉर्कमध्ये आयोजित या सोहळ्यासाठी दिलजीत  चक्क हॉलिवूड गायिका शकिरासोबत एकाच व्हॅनिटीतून गेला. व्हॅनिटीमध्ये असताना शकिराची असिस्टंट तिचा आऊटफिट नीट करत होती. तर समोरच दिलजीत बसला होता. एकीने व्हॅनिटीतला व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. तेव्हा दिलजीत चॅटजीपीटी दाखवत म्हणाला, 'मी इंग्रजी शिकतोय...माझं इंग्रजी वाईट आहे.' ते ऐकून शकिरालाही हसू अनावर झालं. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याशिवाय स्वत: शकिरानेही तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे.  त्यात ती दिलजीतकडे कॅमेरा करत म्हणते, 'say hi to India, hi India'.


दिलजीतने मेट गालामध्ये फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी डिझाईन केलेला आऊटफिट परिधान केला होता. विशेष म्हणजे या सोहळ्यात दिलजीतची सीट पॉप क्वीन शकिराच्या बाजूलाच होती. तसंच त्यांच्यासोबत 'पुसीकॅट डॉल्स'ची फ्रंटवुमन निकोल शेर्जिंगरही होती. तिचे 'बीप',
'डोंट' ही गाणी चांगलीच लोकप्रिय आहेत. 

Web Title: met gala 2025 pop queen shakira shared video with punjabi singer diljit dosanjh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.