या बॉलिवूड सेलिब्रेटींनी २०१७ मध्ये घेतला जगाचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-19T11:34:47+5:302018-06-27T20:02:40+5:30
२०१७ हे वर्षं काहीच दिवसांत संपणार आहे. जाणून घेऊया २०१७ मध्ये कोणत्या सेलिब्रेटींनी घेतला जगाचा निरोप...

या बॉलिवूड सेलिब्रेटींनी २०१७ मध्ये घेतला जगाचा निरोप
२ १७ हे वर्षं काहीच दिवसांत संपणार आहे. जाणून घेऊया २०१७ मध्ये कोणत्या सेलिब्रेटींनी घेतला जगाचा निरोप...
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे ४ डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. शशी कपूर यांचा जन्म 1938 मध्ये झाला होता. त्यांच्या पश्चात करण कपूर, कुणाल कपूर आणि संजना कपूर ही त्यांची मुले आहेत. शशी कपूर यांना २०१४ मध्ये फुप्फुसामध्ये जंतू संसर्ग झाला होता. त्याआधी त्यांची बायपास सर्जरी देखील करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांची तब्येत खालावत गेली.
![]()