/>सर्वांच्या नजरा, राकेश रोशन आणि शाहरुख खानच्या अर्ध्या रात्रीच्या मिटींगकडे लागलेल्या आहेत. परिणाम काय होऊ शकतो? का ‘काबिल’ आणि ‘रईस’ मध्ये क्लैश होतील?, का एक चित्रपट आपले पाऊल मागे घेईल?, चर्चेत असे आहे की, राकेश रोशन ‘काबिल’ची तारीख बदलत नाही आहे. हा चित्रपट २६ जानेवारीलाच रिलीज होणार आहे. आता पाहुया शाहरुखचा ‘रईस’ चित्रपट. ज्याचा पहिला लुक गेल्या वर्षी बजरंगी भाईजानसोबत रिलीज झाला होता. हा चित्रपट यावर्षी ईदच्या दिवशी रिलीज होणार होती, मात्र सुलतानमुळे रिलीजची तारीख पूढे ढकलण्यात आली. मग रिलीज तारीख २६ जानेवारी ठेवण्यात आली, आणि नेमके याच दिवशी राकेश रोशन अगोदरपासूनच ऋतिक रोशन स्टारर काबिल रिलीज करण्याचे जाहीर करुन चुकला होता. आणि जेव्हा शाहरुख खानच्या टीमने रईस रिलीज जाहीर केला तर राकेश रोशन खूपच संतापला.