विद्युत जामवालचा 'कमांडो ३' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 20:00 IST2019-03-04T20:00:00+5:302019-03-04T20:00:00+5:30
'कमांडो ३' मध्येही विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त करणार आहेत

विद्युत जामवालचा 'कमांडो ३' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो विद्युत जामवालने 'कमांडो' चित्रपटात आपल्या अॅक्शन सीनने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग 'कमांडो २' देखील प्रदर्शित झाला. या सिनेमाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच विद्युतने जाहीर केली आहे.
'कमांडो ३' मध्येही विद्युत मुख्य भूमिकेत झळकणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य दत्त करणार आहेत. गेल्या वर्षी जुलैमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून यावर्षी २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटामध्ये विद्युतसोबत अदा शर्मा, अंगीर धर आणि गुलशन देवैया यासारखे कलाकार स्क्रीन शेअर करणार आहेत.
या चित्रपटाव्यतिरिक्त विद्युतचा ‘जंगली’ हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. जंगलीचे दिग्दर्शन हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शन चक रसल यांनी केले आहे. विद्युतचे चाहते कमांडो ३च्या प्रदर्शनाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.