शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान डेब्यूसाठी तयार, पण अभिनय नाही करणार दुसरंच काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 19:33 IST2022-02-22T19:25:06+5:302022-02-22T19:33:27+5:30

Aryan Khan : अनेकांना आतुरता लागली आहे की, बॉलिवूड किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) फिल्म इंडस्ट्रीत कधी डेब्यू करणार आहे.

Media reports says Shahrukh Khan son Aryan Khan soon debut as a writer for web series | शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान डेब्यूसाठी तयार, पण अभिनय नाही करणार दुसरंच काम!

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान डेब्यूसाठी तयार, पण अभिनय नाही करणार दुसरंच काम!

गेल्या काही वर्षात बऱ्याच स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आणि त्यांनी इंडस्ट्रीत आपली एक वेगळी जागाही मिळवली. अशात अनेकांना आतुरता लागली आहे की, बॉलिवूड किंग शाहरूख खान (Shahrukh Khan) चा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) फिल्म इंडस्ट्रीत कधी डेब्यू करणार आहे. शाहरूखने अनेक मुलाखतीत सांगितलं आहे की, आर्यनला अभिनयात जास्त इंटरेस्ट नाही. तो फिल्म मेकिंगमध्ये जास्त इंटरेस्टेड आहे. आता अशी चर्चा सुरू आहे की, आर्यन खान लवकरच डेब्यू करणार आहे.

गुपचूप सुरू आहे काम

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन खान अनेक आयडियाजवर काम करत आहे. यात वेब सीरीज आणि फीचर फिल्मचा समावेश आहे. असं सांगितलं जात आहे की आर्यन ज्या विषयांवर काम करत आहेत त्यातील काही प्रोजेक्ट रेड चीलीज इंटरटेन्मेंटच्या बॅनलखाली बनवले जातील आणि हे प्रोजेक्ट अॅमेझॉन प्राइमसाठी असतील. तसेच एक फीचर फिल्मही बनवली जाईल.

काय असेल कथा?

चर्चा अशी आहे की, आर्यन खानच्या वेब सीरीजमध्ये एका कट्टर फॅनची कथा असेल. ज्याची लाइफ रोमांचक असेल. तर सिनेमाबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही.

कधी सुरू होणार शूटींग

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर सगळं काही जुळून आलं तर यावर्षीय शूटींग सुरू होऊ शकते. खास बाब ही आहे की, आर्यन खान सध्या या दोन विषयावंर रेड चीलीजच्या ऑफिसमध्ये रायटर्स रूममध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान सध्या को-रायटर बिलाल सिद्दीकीसोबत काम करत आहे.
 

Web Title: Media reports says Shahrukh Khan son Aryan Khan soon debut as a writer for web series