​ मौलवी, १० लाख तयार ठेव; सोनू निगमचे फतव्याला दिले उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 12:04 IST2017-04-19T06:34:05+5:302017-04-19T12:04:05+5:30

पार्श्वगायक सोनू निगम याच्या अजानविरोधी टिष्ट्वट प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड ...

Maulvi, ready for one million; Sonu corporation fatwa answered! | ​ मौलवी, १० लाख तयार ठेव; सोनू निगमचे फतव्याला दिले उत्तर!

​ मौलवी, १० लाख तयार ठेव; सोनू निगमचे फतव्याला दिले उत्तर!

र्श्वगायक सोनू निगम याच्या अजानविरोधी टिष्ट्वट प्रकरणाने आता वेगळेच वळण घेतले आहे. मुस्लिम नेता आणि पश्चिम बंगालचे अल्पसंख्याक युनायटेड काउंसिलचे उपाध्यक्ष सय्यद शाह आतेफ अली कादरी यांनी सोनू निगमविरोधात फतवा काढला आहे. एवढेच नाही तर सोनूचे मुंडण करुन त्याला जुन्या चपलांचा हार घालणा-या व्यक्तीला 10 लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचीही घोषणाही त्यांनी केली आहे. गायक सोनू निगम यांनी धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाचा अपमान केला आहे त्यामुळे त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे. शिवाय, सोनू निगम हे निव्वळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे वागत आहे, अशी टीका कादरी यांनी सोनू निगमवर केली आहे. पण कादरीला सोनूने ठोस प्रत्युत्तर दिले आहे. आज २ वाजता आलीम माझ्या घरी येऊन माझे मुंडण करणार आहे. मौलवी, १० लाख तयार ठेव, असे ट्विट सोनूने केले आहे. विशेष म्हणजे, यावेळी मीडियाचे स्वागत असेल, असेही सोनूने म्हटले आहे. 


 ALSO READ :  सोनू निगमला टिवटिवाट भोवला; एफआयआर दाखल, फतवा जारी!

‘मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावे लागते. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबणार?’, असा प्रश्न सोनूनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. ‘मोहम्मद पैंगबर यांनी इस्लामची स्थापना केली होती, तेव्हा विजेची सोय नव्हती. तर मग, एडिसनच्या संशोधनानंतर असले चोचले कशाला ?, असा सवाल सोनूने उपस्थित केला होता.  सोनूने या सर्व प्रकाराला धार्मिक बळजबरीचे नाव दिले होते. या ट्विटनंतर सोनूला अनेकांनी धारेवर धरले होते. सोशल मीडियावरील या टिवटिवीमुळे सोनू निगमला काही धमक्याही देण्यात येत असल्याचे कळते. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी त्याच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त केला आहे. 

a

 

Web Title: Maulvi, ready for one million; Sonu corporation fatwa answered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.