चौपट कॉमेडी अन् धमाल! रितेश देशमुखच्या 'मस्ती ४' सिनेमाचा ट्रेलर पाहून हसू आवरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:26 IST2025-11-04T15:25:51+5:302025-11-04T15:26:23+5:30
‘मस्ती 4’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रितेश, विवेक, आफताबची खास केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय

चौपट कॉमेडी अन् धमाल! रितेश देशमुखच्या 'मस्ती ४' सिनेमाचा ट्रेलर पाहून हसू आवरणार नाही
कॉमेडी आणि धमाल आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी! ‘मस्ती’ या सुपरहिट फ्रँचायझीचा चौथा भाग ‘मस्ती 4’ चा ट्रेलर प्रेक्षकांसमोर आला आहे. वेवबँड प्रॉडक्शन निर्मित हा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा अधिक मजेशीर ठरला आहे.
या वेळेस ‘मस्ती 4’च्या ट्रेलरमध्ये कॉमेडी आणि न थांबणाऱ्या मनोरंजनाचा एक भन्नाट खेळ दिसून येतोय. सर्वात खास गोष्ट म्हणजे, बॉलिवूडचं आयकॉनिक कॉमेडी त्रिकूट रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदसानी पुन्हा एकदा ‘अमर’, ‘मीत’ आणि ‘प्रेम’च्या भूमिकांमध्ये परतले आहेत. त्यांच्या पुनरागमनामुळे चाहत्यांसाठी ‘मस्ती 4’ ही एक जबरदस्त ट्रीट ठरणार आहे.
या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मिलाप मिलन झवेरी यांनी केले असून, त्यांच्या दिग्दर्शनात प्रेक्षकांना खळखळून हसवणारी दृश्यं, जोशपूर्ण संगीत आणि विनोदाचा तडका पुन्हा दिसतोय. “लव्ह व्हिसा” ही चित्रपटाची टॅगलाईन असून, या तिघांची केमिस्ट्री त्याला एक फुल-ऑन कॉमेडी राइड बनवते.
रितेश देशमुख म्हणाला, “एखाद्या आवडत्या फ्रँचायझीत पुन्हा परतणं ही वेगळीच मजा आहे. ‘मस्ती 4’ मध्ये खास ट्विस्ट आणि भरपूर हसवणूक आहे. विवेक आणि आफताबसोबत पुन्हा काम करणं म्हणजे कॉलेज रीयुनियनसारखं वाटलं. मी अनेक वर्षांत इतका हसलो नव्हतो! प्रेक्षकांना मिलापच्या दिग्दर्शनात प्रचंड मस्ती अनुभवायला मिळणार आहे.”
या वेळी या तिकडीसोबत नव्या चेहऱ्यांचाही धमाल तडका लागला आहे — श्रेय शर्मा, रुही सिंह आणि एल्लनाझ नौरोजी या अभिनेत्री या भागात झळकणार आहेत. त्याचबरोबर अर्शद वारसी, तुषार कपूर, शाद रंधावा आणि निशांत मलकानी हे कलाकारही चित्रपटात विनोद आणि गोंधळाची भर घालतील.थोडक्यात, ‘मस्ती 4’ हा चित्रपट प्रेक्षकांना जुन्या आठवणींसह नव्या हास्याचा, धमाल आणि मैत्रीचा अनुभव देणार आहे.