"माशाअल्लाह, काय दुधासारखं शरीर आहे", ६९ वर्षीय अन्नू कपूर यांची तमन्नाच्या बॉडीवर अश्लील कमेंट, नेटकरी संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:21 IST2025-10-14T12:21:11+5:302025-10-14T12:21:51+5:30
Tamannah Bhatia And Annu Kapoor : तमन्ना भाटियाच्या 'आज की रात' गाण्यावर जिथे लाखो लोकांनी रील्स बनवल्या आहेत, तिथेच अभिनेता अन्नू कपूर यांनी या स्पेशल गाण्याची एक क्लिप पाहून इतकी अश्लील कमेंट केली आहे. जी ऐकल्यानंतर लोक ६९ वर्षांच्या या अभिनेत्याला खूप सुनावत आहेत.

"माशाअल्लाह, काय दुधासारखं शरीर आहे", ६९ वर्षीय अन्नू कपूर यांची तमन्नाच्या बॉडीवर अश्लील कमेंट, नेटकरी संतापले
दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून ते हिंदी चित्रपटांपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री तमन्ना भाटिया सध्या तिच्या चित्रपटांमधील स्पेशल गाण्यांमुळे चर्चेत आहे. आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' या वेब सीरिजमधील 'गफूर' गाण्यातील तिचे 'मूव्ह्ज' असोत किंवा 'स्त्री २' मधील 'आज की रात' हे गाणे असो, दोन्ही गाण्याला खूप पसंती मिळाली आहे. तिच्या 'आज की रात' गाण्यावर जिथे लाखो लोकांनी रील्स बनवल्या आहेत, तिथेच अभिनेता अन्नू कपूर यांनी या स्पेशल गाण्याची एक क्लिप पाहून इतकी अश्लील कमेंट केली आहे. जी ऐकल्यानंतर लोक ६९ वर्षांच्या या अभिनेत्याला खूप सुनावत आहेत.
अलीकडेच शुभांकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियाचे कौतुक करताना तिच्या शरीराचा उल्लेख दुधासारखे शुभ्र शरीर असा केला. अभिनेत्रीबद्दल अन्नू कपूर यांचे विनोद इथेच थांबले नाहीत. खरेतर, होस्टने अन्नू कपूर यांना विचारले की त्यांना तमन्नाचे 'आज की रात' गाणे आवडले का, तेव्हा अन्नू कपूर यांनी लगेच उत्साहाने उत्तर दिले, "माशाअल्लाह काय दुधाळ शरीर आहे."
काय म्हणाले अन्नू कपूर?
त्यानंतर लगेच होस्टने सांगितले की, हे गाणे ऐकून मुले लगेच झोपी जातात, हे ऐकून अन्नू कपूर लगेच म्हणाले, "किती वयाची मुले झोपतात... ७० वर्षांचा मुलगाही असू शकतो ना, मी असतो तर हेच विचारले असते की कोणत्या वयाची मुले झोपी जातात. इंग्रजीमध्ये ते बोलले की तो ७० वर्षांचा जुना मुलगा आहे आणि हा ११ वर्षांचा म्हातारा. ही बहीण आपल्या गाण्याने, आपल्या शरीराने, आपल्या दूधाळ चेहऱ्याने आपल्या मुलांना झोपवते, ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या देशातील मुले चांगली आणि निरोगी झोप घेत असतील तर देशावर कृपा होईल. आणखी काही इच्छा असतील तर देवाने त्या पूर्ण कराव्यात."
अभिनेत्यावर संतापले नेटकरी
तमन्ना भाटियाबद्दल अशा प्रकारची कमेंट करणे तिच्या चाहत्यांना आणि सोशल मीडिया युजर्सना अजिबात आवडले नाही. एका युजरने लिहिले, "अन्नू कपूर अशा अश्लील कमेंट का करत आहेत." दुसऱ्या युजरने म्हटले, "तुम्ही तुमच्या मुलीसाठी असे शब्द वापरू शकता का?" आणखी एका युजरने लिहिले, "कृपया थोडा सन्मान द्यायला शिका, तुमच्या घरात मुलगी किंवा नातवंडं नाहीत का?" मात्र, काही लोक त्यांचे समर्थनही करत आहेत.